अतिवृष्टीमुळे अहिल्यानगर जिल्ह्यातील 2 प्रमुख रस्ते वाहतुकीसाठी बंद

अतिवृष्टीमुळे अहिल्यानगर जिल्ह्यातील 2 प्रमुख रस्ते वाहतुकीसाठी बंद; सरस्वती नदीवरील पूल पाण्याखाली

जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नदी व नाल्यांवरील पाणीपातळीत वाढ झाली असून सुरक्षिततेच्या दृष्टीने खालील रस्ते तात्पुरते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत.

1. पेडगाव – शेडगाव मार्ग बंद
पत्ता: निमगाव खलू – कौठा – अजनुज – पेडगाव – शेडगाव (रा.मा. ४७८)
तपशील: कि.मी. १८/२०० येथील सरस्वती नदीवरील पर्यायी मार्ग पाण्याखाली गेल्यामुळे पेडगाव ते शेडगाव मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.

2. आर्वी पुनर्वसन – अजनुज मार्ग बंद
पत्ता: कौठा – अनगरे – आर्वी – अजनुज – श्रीगोंदा (रा.मा. ४७९)
तपशील: कि.मी. ७/७० येथील पाईप मोरीवरून पाणी वाहत असल्यामुळे आर्वी पुनर्वसन ते अजनुज मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.

⚠️ नागरिकांना आवाहन
– बंद मार्गांवरून प्रवास करण्याचा प्रयत्न करू नये.
– पर्यायी सुरक्षित मार्गांचा वापर करावा.
– प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून सहकार्य करावे.

पाणी ओसरल्यानंतर रस्ते तपासून वाहतुकीसाठी पुन्हा सुरू करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles