गेल्या महिन्यापासून जुलै-ऑगस्टच्या हप्त्याची वाट पाहत आहेत. दोन महिन्यांचा हप्ता एकत्र मिळणार का आणि खात्यात ३००० रुपये कधी जमा होणार, याकडे लाखो महिलांचे लक्ष लागले आहे. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी योजनेतल्या ई-केवायसी प्रक्रियेबद्दल महत्त्वाची माहिती दिली आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी जुलै-ऑगस्टच्या हप्त्याची निश्चित तारीख अजून जाहीर केलेली नाही. त्यामुळे लाभार्थी महिलांची उत्सुकता आणि चिंता कायम आहे. सुत्रांना मिळालेल्या माहितीनुसार, जुलै आणि ऑगस्टचे दोन हप्ते एकत्रितपणे ३००० रुपये देण्याची शक्यता व्यक्त केली आहे. हप्ता उशिरा येण्यामागे स्वातंत्र्यदिनामुळे निर्माण झालेल्या प्रशासकीय प्रक्रियेचा परिणाम असल्याचं सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. तसेच रक्षाबंधनापूर्वी महिलांच्या खात्यात पैसे जमा होण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे. पण याबद्दल अधिकृत घोषणा होणं बाकी आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, लाडकी बहीण योजनेत ई-केवायसी हा महत्त्वाचा मुद्दा होता. योजना सुरू झाल्यानंतर मोठ्या प्रमाणावर पडताळणी करणे तातडीने शक्य नव्हते. त्यानंतर सरकारने लाभार्थ्यांची छाननी सुरू केली. नियमांचे उल्लंघन करून लाभ घेणाऱ्या व्यक्तींना ई-केवायसी पूर्ण करण्यासाठी अनेक संधी देण्यात आल्या.
राज्यातल्या १ कोटी ६५ लाख महिलांनी ई-केवायसी पूर्ण केली असून त्या पात्र लाभार्थी ठरल्या आहेत. पात्र महिलांना नियमितपणे योजनेचा लाभ मिळत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. योजनेचा लाभ घेणाऱ्या काही लाभार्थ्यांच्या कुटुंबांकडून आयकर भरला जात असल्याचं तपासणीत समोर आलं. अशा व्यक्तींची नावं योजनेतून वगळ्यात आली आहेत. याशिवाय काही सरकारी कर्मचारी आणि पुरुषांनीही योजनेचा लाभ घेतल्याचं आढळलं. त्यांच्यावर कारवाई करून घेतलेली रक्कम वसून केली जाणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.


