लाडक्या बहि‍णींना सरकार मोठं गिफ्ट देणार, एकाचवेळी खात्यात खटाखट ४५०० रूपये येणार? वाचा अपडेट

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या राज्यातील महिलांना ईकेवायसी दुरूस्तीसाठी दिलेली मुदत ३० एप्रिल रोजी संपली आहे. ईकेवायसी प्रोसेस झाल्यानंतर आता लाडकीच्या खात्यात पैसे कधी येणार? असा सवाल पात्र महिलांना पडला आहे. मार्च, एप्रिल महिन्याचा हप्ता अजून लाडक्या बहि‍णींच्या खात्यात आलेला नाही. त्यात आता मे महिना सुरू झाला आहे. त्यामुळे लाडक्या बहि‍णींना सरकार एकत्र ४५०० रूपये देणार का? या चर्चेला सुरूवात झाली आहे. ईकेवायसी दुरूस्तीनंतर राज्यातील लाडक्या बहि‍णींची संख्या मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार अर्ज बाद झाले, अपात्र ठरले अथवा अर्जच भरला नाही अशा लाडक्या बहि‍णींची संख्या तब्बल ५४ लाख असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या ५४ लाख लाडक्या बहि‍णींचा १५०० रूपयांचा हप्ता आता कायमचा बंद झाला आहे. त्यामुळे सरकारचे प्रत्येक महिन्याला कोट्यवधि रूपये वाचणार आहे. ई-केवायसी प्रक्रियेनंतर १ कोटी ८९ लाख बहिणी पात्र ठरल्याची माहिती समोर आली आहे. महाराष्ट्र सरकारकडून ईकेवायसी दुरूस्तीची मुदत वाढवण्यात आली नाही. त्यामुळे राज्यात १ कोटी ८९ महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ प्रत्येक महिन्याला मिळणार आहे.

राज्यातील पात्र महिलांच्या खात्यात फेब्रुवारी महिन्यापर्यंत १५०० रूपये जमा झाले आहेत. पण त्यानंतर मागील २ महिन्यांपासून लाडक्या बहि‍णींच्या खात्यात एकही हप्ता जमा झालेला नाही. आता केवायसीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यामुळे लाडकीच्या खात्यात पैसे जमा होतील, याकडे महिलांच्या नजरा खिळल्या आहेत. पण लाडकीच्या खात्यात ३ हप्त्याचे एकत्र ४५०० रूपये जमा होणार का? मार्च, एप्रिल आणि मे महिन्यांचा हप्ता राज्यातील पात्र महिलांच्या खात्यात येणार का? की फक्त मार्च महिन्याचा अथवा मार्च-एप्रिल महिन्यांचा ३ हजारांचा हप्ता जमा होणार, यावर सस्पेन्स कायम आहे.मार्च, एप्रिल आणि आता मे.. या ३ महिन्यांचा सन्मान निधी महिलांच्या खात्यावर जमा झालेला नाही. त्यांच्या खात्यावर कधी आणि किती पैसे जमा होणार? याबाबत सरकारकडून अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. कदाचीत ईकेवायसीची पडताळणी अंतिम टप्प्यात असेल. ईकेवायसी प्रोसेस संपल्यानंतरच लाडक्या बहि‍णींना पुढील हप्ता जमा होईल, असा अंदाज काही लोकांनी लावला आहे. राज्यातील लाडक्या बहि‍णी सरकारच्या निर्णायाकडे चातकाप्रमाणे लक्ष देऊन आहेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles