नगर-कल्याण रोडवरील लक्ष्मण काळे खून प्रकरण 24 तासांत उघड;, 4 आरोपी अटकेत

कवडे मळा खून प्रकरण 24 तासांत उघड; जमिनीच्या वादातून लक्ष्मण काळेंचा कुऱ्हाडीने खून, 4 आरोपी अटकेत

अहिल्यानगर, 18 जून 2026: कवडे मळा, अहिल्यानगर येथील खळबळजनक “लक्ष्मण काळे” खून प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेकडून 24 तासांच्या आत छडा लावण्यात आला आहे. या प्रकरणी 4 आरोपींना देहेरे शिवारातून ताब्यात घेऊन बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.

वऱ्हांड्यात झोपलेल्या दाम्पत्यावर हल्ला
प्रस्तुत बातमीची हकीगत अशी की, दिनांक 15/06/2026 रोजी रात्री 11.00 ते 16/06/2026 रोजी पहाटे 3.00 च्या दरम्यान फिर्यादीचा भाऊ प्रशांत भोसले हे राहत असलेल्या शेडच्या बाहेर वऱ्हांड्यात, जाधव मळा, कवडे मळा रोड, नगर-कल्याण रोड येथे कोणीतरी अज्ञात इसमाने अज्ञात कारणासाठी फिर्यादीचे पती लक्ष्मण मार्तंड काळे रा. काळेगाव, अमरापूर, ता. शेवगाव, जि. अहिल्यानगर यांच्यावर कुऱ्हाडीने वार करून जीवे ठार मारले. तसेच फिर्यादी झोपेत असताना त्यांच्या तोंडावर वार करून त्यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. सदर घटनेबाबत कोतवाली पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. 654/2026 भा.न्या.सं. कलम 103(1), 109 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

24 तासांत तांत्रिक विश्लेषणातून आरोपी गवसले
सदरचा गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांना आरोपीचा शोध घेऊन गुन्हा उघडकीस आणण्याचे आदेश दिले. त्यानुसार श्री. संतोष मुटकुळे यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन तांत्रिक विश्लेषण व गुप्त बातमीदारामार्फत तपास सुरू केला.

पथकास सदरचा गुन्हा इसम नामे 1) लक्की राहुल वैरळ, 2) करण विलास शिंदे, 3) गणेश मनोज चावरे, 4) विशाल रामचंद्र उमाप, 5) करण नंतर काळे, 6) आदित्य भाकरे रा. विळद ता.जि. अहिल्यानगर यांनी मिळून केला असून ते सध्या देहेर गावात खंडोबाचे मळा येथे असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली.

देहेरे शिवारातून 4 आरोपी ताब्यात
पथकाने तात्काळ देहेर गावातील खंडोबाचे मळा येथे जाऊन शोध घेतला असता 4 इसम संशयास्पदरित्या थांबल्याचे दिसून आले. शिताफीने त्यांना ताब्यात घेऊन नाव गाव विचारले असता त्यांनी नावे सांगितली: 1) लक्की उर्फ बाबा राहुल वैराळ वय 19, रा. विळद घाट, 2) करण विशाल शिंदे वय 18, रा. गवळीवाडा, विळद, 3) गणेश उर्फ गणीबाबा मनोज चावरे वय 22, रा. देवळाली प्रवरा ता. राहुरी, 4) विशाल उर्फ रानटी रामचंद्र उमाप वय 18, रा. विळदघाट डोके पेट्रोलपंपाजवळ. ताब्यातील आरोपीकडे विचारपूस करता आरोपी लक्की उर्फ बाबा राहुल वैराळ याने त्याचे वरील साथीदारांसह जमिनीच्या वादातून सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली आहे.

20,100 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत
ताब्यातील आरोपींकडून 20,000 रु. किमतीचा एक पोवा कंपनीचा मोबाईल व 100 रु. किमतीचे एक जिओ सिमकार्ड असा एकूण 20,100 रु. किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

ताब्यातील आरोपीस कोतवाली पोलीस स्टेशन येथे हजर करून अटक करण्यात आली असून गुन्ह्याचा पुढील तपास कोतवाली पोलीस स्टेशन करीत आहे.

पथकाचे कौतुक
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि हरिष भोये, पोलीस अंमलदार शाहिद शेख, सुनिल पवार, अरविंद भिंगारदिवे, गणेश धोत्रे, योगेश भिंगारदिवे, फुरकान शेख, प्रशांत राठोड, भाऊसाहेब काळे, महिला पोलीस अंमलदार वंदना मोढवे, सोनल भागवत, चिमा काळे, चालक भगवान धुळे, अरुण मोरे यांच्या पथकाने केली आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles