श्रीरामपूर येथील अवैध वाळु तस्करांविरूध्द स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई
छाप्यामध्ये 19,90,000/- रू किंमतीचा मुद्देमालासह 04 आरोपी ताब्यात
मा.श्री.सोमनाथ घार्गे, पोलीस अधिक्षक, अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेस जिल्ह्यातील अवैध व्यावसायिकांची माहिती काढुन कारवाई करणेबाबत आदेश दिले आहेत.त्यानुषंगाने पोनि/श्री. दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखा व तपास पथकातील पोलीस अंमलदार बाळासाहेब नागरगोजे, अशोक लिपणे, संदीप दरंदले, रणजीत जाधव, आकाश काळे व रमीजराजा आत्तार अशांचे पथक तयार करुन अवैध व्यावसायिकांची माहिती काढुन कारवाई करणेकामी पथकास रवाना केले.
दिनांक 03/07/2025 रोजी पथक श्रीरामपूर तालुका पोलीस ठाणे हद्दीत अवैध धंदयाची माहिती काढत असताना पथकास गोपनीय माहिती मिळाली की, नायगाव शिवार ता.श्रीरामपूर येथील गोदावरी नदीपात्रात दोन इसम ट्रॅक्टरट्रॉलीमधुन वाळु उपसा करून वाहतुक करीत आहेत.मिळालेल्या माहितीतील नमूद ठिकाणी पथकाने पंचासह गेले असता दोन ट्रॅक्टर मजुरांच्या सहाय्याने वाळु भरताना मिळून आल्याने, पथकाने छापा टाकुन कारवाई करून दोन ट्रॅक्टर चालक 1) करण अशोक वाघ, वय 20, रा.नायगाव, ता.श्रीरामपूर, जि.अहिल्यानगर 2) अनिल नारायण आमले, वय 24, रा.गोंडेगाव, ता.श्रीरामपूर, जि.अहिल्यानगर तसेच ट्रॅक्टर मालक 3) दत्तात्रय रावसाहेब भवार, रा.गोंडेगाव, ता.श्रीरामपूर, जि.अहिल्यानगर व 4) आदित्य काकासाहेब दिवे, रा.गोंधवणी वॉर्ड नं.1, श्रीरामपूर, जि.अहिल्यानगर अशांना ताब्यात घेतले.ट्रॅक्टर चालक याचे वाळु वाहतुक व उपसाबाबत परवाना नसल्याने घटनाठिकाणावरून 19,90,000/- रू किं.त्यात दोन ट्रॅक्टर ट्रॉलीसह व दोन मोटार सायकल असा मुद्देमाल जप्त केला आहे.
पथकाने ताब्यातील आरोपीस मुद्देमालासह श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशन येथे हजर केले असुन वरील आरोपीविरूध्द श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशन गुरनं 353/2025 बीएनएस 2023 चे कलम 303 (2), 3 (5) वगैरे प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.दाखल गुन्हयाचा पुढील तपास श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशन हे करीत आहेत.
सदर कारवाई मा.श्री.सोमनाथ घार्गे, पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर, मा.श्री.वैभव कलुबर्मे, अपर पोलीस अधीक्षक,श्रीरामपूर, व मा.श्री. बसवराज शिवपुजे, उपविभागीय पोलीस अधिकारी, श्रीरामपूर उपविभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.


