महंत आदिनाथ शास्त्री महाराजांना डिस्चार्ज ;शास्त्रीनी केला धक्कादायक खुलासा म्हणाले,

बीड जिल्ह्यातील आष्टी इथल्या तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ महाराज शास्त्री यांनी स्वतःच्या अंगावर धारदार शस्त्राने वार करून घेतल्याची धक्कादायक घटना रविवारी (ता. 15) सायंकाळी घडली होती. या घटनेमुळे तारकेश्वर गडाच्या भाविकांमध्ये मोठी खळबळ उडाली होती.

आता या घटनेबाबत बीडमधील तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ महाराज शास्त्री यांनी धक्कादायक खुलासा केला आहे. ‘आपण लिंगाचा स्वेच्छेने त्याग केला आहे,’ अशी माहिती त्यांनी माध्यमांशी बोलताना दिली. आदिनाथ शास्त्री महाराज म्हणाले, “आज रुग्णालयातून डिस्चार्ज होत आहे. जे काही माझ्याकडून झाले, लिंग त्याग झाला. मी माझ्या मनाने स्वतः केला. याच्यामध्ये कोणाचं काही नाही. कोणाचाही त्रास नाही. जिथपर्यंत माझा आवाज जाईल, तितकी माणसं माझ्याकडे येतात. सगळी माणसं माझी आहे. कोणतीही अडचण नाही. जय श्रीराम!”

आदिनाथ महाराज शास्त्री यांनी रविवारी गडावरच आपल्यावर वार करून घेतला. त्यांना उपचारासाठी अहिल्यानगरमधील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. यानंतर त्यांच्या अनुयायींमध्ये, महाराज जखमी झाल्याची माहिती वाऱ्यासारखी पसरली. त्यावेळी रुग्णालयात मोठ्याप्रमाणात गर्दी झाली होती.

महाराजांनी स्वतः वर वार करून घेतल्याने वेगवेगळ्या चर्चा सुरू होत्या. जखमी अवस्थेत त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले, त्यावेळी त्यांना भेटण्यासाठी भाजप आमदार मोनिका राजळे, भाजपचे युवा कार्यकर्ते अक्षय कर्डिले उपस्थित होते.महाराजांनी गुप्तांग कापल्याची दबक्या आवाजात चर्चा सुरू होती. पण आज महाराजांनी त्यावर भाष्य करून, चर्चांना पूर्णविराम दिला. तसेच त्यांना रुग्णालयातून आज दुपारी डिस्चार्ज करण्यात आल्याने, त्यांच्या अनुयायींमध्ये आनंदाचे वातावरण होते.आदिनाथ महाराज शास्त्री यांच्या डिस्चार्ज वेळी, अजित पवार राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप आणि पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे उपस्थित होते. या दोघांनीही त्यांच्याशी संवाद साधला. प्रकृतीची विचारपूस केली.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles