बारामती विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीत गुरुवारी मतदान होत असताना आमदार रोहित पवार आणि दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र जय पवार यांनी २०२९ च्या निवडणुकीबाबत भाष्य केलं. रोहित पवारांनी मतदानानंतर माध्यमांशी बोलताना म्हणाले, बारामतीत 2029 ला पवार विरूध्द पवार अशी निवडणूक होण्याची शक्यता आहे, याबाबत अजित पवारांचे बंधू श्रीनिवास पवार यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्याचबरोबर या वक्तव्याबाबत जय पवार आणि रोहित पवार यांच्या वक्तव्यावरती बोलताना श्रीनिवास पाटील म्हणालेत की, दोघांनाही आज या क्षणी बोलायचं नाही गरज नव्हती, आणखी फार लांब जायचं आहे, आज फार महत्त्वाचा दिवस आहे, आपण सगळे पुढे होऊन दादासाठी सगळं करत आहे, कोणीही विरोधात उभा राहिलेला नाहीये, आता मला वाटते की त्या गोष्टी बोलायची गरज नव्हती.
पवार परिवारातील सर्वांचा संवाद आहे, पण राजकारण म्हणून फक्त पवार साहेबच (शरद पवार) निर्णय घ्यायचे, पहिल्यापासून अगदी साठ वर्षे झाली साहेब ठरवतात, कारण ते त्यांचं क्षेत्र आहे. आम्ही कुटुंब म्हणून एक होतो. आता जरा काल साहेबांना ऍडमिट केलं, त्यांची तब्येत बरी नव्हती, एखाद दिवस ते या दोघांना बोलतील, साहेबांना न विचारता ते दोघांनी वक्तव्य केलं त्यामुळे ते बोलतील असंही पुढे श्रीनिवास पवारांनी म्हटलं आहे.
आमदार रोहित पवारांना बारामतीतून निवडणूक लढवायची इच्छा आहे का? या प्रश्नावर उत्तर देताना श्रीनिवास पवार म्हणाले, आता ते त्यानेच ठरवायचं आहे, त्याच्या डोक्यात काय आहे ते आपण सांगू शकत नाही, ते सर्व काळच ठरवेल, अलीकडे रोहित पवारांचा बारामतीकडे दौरा वाढलेला दिसत आहे, यावर बोलताना श्रीनिवास पवार म्हणाले, हो ते मी पण बघत आहे, दौरे वाढले आहेत, पण साहेबांचा मतदारसंघ सांभाळायची जबाबदारी त्याला घ्यायचे असेल तर सांगता येत नाही, म्हणूनही कदाचित वाढले असतील, असेही पुढे श्रीनिवास पवार यांनी म्हटले आहे.


