राज्य सरकारने कर्जबाजारी शेतकऱ्यांना कर्जमाफी देत त्यांना मोठा दिलासा दिला. आता सरकारनं शेतकऱ्यांसाठी आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेतलाय. त्यामुळे शेतकरी वर्गातून आनंद व्यक्त केला जातोय. सरकारनं गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेची व्याप्ती वाढविण्यचा निर्णय घेतलाय. आता या योजनेत शेतमजूर आणि महिला शेतकऱ्यांचाही समावेश करण्यात आलाय. त्याचप्रमाणे आता या योजनेचा लाभ शेतकरी आणि शेतमजूर कुटुंबातील प्रत्येक सदस्यालाही मिळणार आहे.राज्य सरकारने कर्जबाजारी शेतकऱ्यांना कर्जमाफी देताना त्यांना मोठा दिलासा दिलाय. त्याचदरम्यान सरकारनं शेतकऱ्यांसाठी आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेतलाय. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेची व्याप्ती वाढविण्यचा निर्णय घेतलाय. आता या योजनेत शेतमजूर आणि महिला शेतकऱ्यांचाही समावेश करण्यात आलाय. त्याचप्रमाणे आता या योजनेचा लाभ शेतकरी आणि शेतमजूर कुटुंबातील प्रत्येक सदस्यालाही मिळणार आहे.
शेती व्यवसायामध्ये प्रत्यक्ष राबणाऱ्या भूमिहीन शेतमजुरांना कामाच्या ठिकाणी त्यांना अपघाताचा धोका असतो. यासह तसेच महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण अधिनियम २०२६ अंतर्गत महिला शेतकरी म्हणून नोंद होणार आहे. यापार्श्वभूमीवर शेतमजूर आणि महिला शेतकऱ्यांचाही गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेत समावेश करण्याचा निर्णय सरकारने घेतलाय. यासह शेतकरी, महिला शेतकरी आणि भूमिहीन शेतमजूर कुटुंबातील १० ते ७५ वर्षे वयोगटातील सर्व सदस्यांचा योजनेत समावेश करण्यात आलाय.
तसेच ही योजना गोपीनाथ मुंडे शेतकरी/भूमिहीन शेतमजूर/महिला शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना या नावाने ओळखली जाईल. योजनेचा कालावधी १ एप्रिल २०२६ ते ३१ मार्च २०३१ असा ५ वर्षांचा असणार आहे. योजनेनुसार कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीचा अपघात होऊन अपंगत्व आले किंवा त्यांचा मृत्यू झाला तर संबंधित शेतकरी, शेतमजूर किंवा त्यांच्या कायदेशीर वारसदारांना अनुदान मिळेल.
अपघातामुळे दोन डोळे अथवा दोन हात किंवा दोन पाय निकामी होणे – २ लाख रुपये
अपघातामुळे एक डोळा व एक हात किंवा एक पाय निकामी होणे – २ लाख रुपये
अपघातामुळे एक डोळा अथवा एक हात किंवा एक पाय निकाणी होणे – १ लाख रुपये


