अहिल्यानगर शहरात मनप्पुरम फायनान्सची 15 लाखांची फसवणूक

अहिल्यानगर-इतर बँकेतून सोने तारणावर घेतलेले कर्ज फेडण्याच्या बहाण्याने आणि बनावट पावत्या दाखवून मनप्पुरम फायनान्सची तब्बल 15 लाख 30 हजार रूपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार बोल्हेगाव उपनगरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात बुधवारी (18 मार्च) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मनप्पुरम फायनान्सचे एरीया हेड मॅनेजर सुजीतकुमार फौदारी प्रसाद (वय 29, रा. भाऊसाहेब फिरोदिया शाळेशेजारी, अहिल्यानगर, मुळ रा. भिलाई, छत्तीसगढ) यांनी फिर्याद दिली आहे. सागर रावसाहेब चोथे (रा. नागापूर, अहिल्यानगर) याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित आरोपी सागर चोथे याने बोल्हेगाव येथील मनप्पुरम फायनान्स शाखेचे एरीया हेड मॅनेजर सुजीतकुमार प्रसाद यांचा विश्वास संपादन केला. चोथे याने आपले सोने इतर बँकांमध्ये तारण असल्याचे भासवले आणि ते सोडवून मनप्पुरम फायनान्सच्या बोल्हेगाव शाखेत ठेवतो असे आमिष दाखवले. त्यासाठी त्याने इतर बँकांच्या बनावट सोने तारण पावत्या सादर करून मॅनेजर प्रसाद यांची दिशाभूल केली. यावर विश्वास ठेवून शाखेने त्याला 15 लाख 30 हजार रूपयांचे कर्ज मंजूर केले. सदरचा प्रकार 8 ते 9 डिसेंबर 2025 दरम्यान घडला.पैसे मिळाल्यानंतर संशयित चोथे याने सोने जमा न करता मोबाइल बंद करून पळ काढला. संशय आल्याने प्रसाद यांनी इतर बँकांमध्ये चौकशी केली असता, सागर चोथे नावाने कोणतेही सोने तारण नसल्याचे समोर आले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच सुजीतकुमार प्रसाद यांनी पोलिसांत धाव घेतली. एमआयडीसी पोलिसांनी संशयित सागर चोथे विरोधात फसवणूकीचा गुन्हा नोंदवला आहे. पोलीस अंमलदार एस. जी. टेमकर अधिक तपास करीत आहेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles