अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नगर तालुक्यातील घटना गुन्हा दाखल

अहिल्यानगर -तालुक्यातील एका गावात अल्पवयीन (वय 15) शाळकरी मुलीवर वेळोवेळी अत्याचार झाल्याने ती गर्भवती राहिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पीडित अल्पवयीन मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात बुधवारी (15 जुलै) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वसंत गहिनीनाथ चौधर (रा. आढाववाडी, पिंपळगाव माळवी, ता. अहिल्यानगर) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मे 2026 पासून संशयित वसंत चौधर याने फिर्यादी अल्पवयीन मुलीला आपल्या राहत्या घरी बोलावून घेतले. तिने नकार दिला असता, वसंत याने तिला जीवे मारण्याची धमकी दिली. तिचे तोंड दाबून तिच्या इच्छेविरूध्द वेळोवेळी अत्याचार केला.

काही दिवसांनंतर पीडित मुलीचे पोट दुखू लागल्याने नातेवाईकांनी तिला उपचारासाठी एमआयडीसी येथील खासगी रूग्णालयात दाखल केले. तेथील महिला वैद्यकीय अधिकार्‍यांनी तपासणी केली असता ती गरोदर असल्याचे समोर आले. यानंतर तात्काळ पोलिसांना माहिती देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने, सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात आणि पोलीस उपनिरीक्षक मनोज मोंढे यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. पीडितेच्या जबाबानंतर पोलिसांनी संशयित आरोपीविरूध्द अत्याचार, पोक्सो आदी कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक मोंढे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles