तामिळनाडूत राजकी उलथापलथ होण्याची शक्यता आहे. कारण थलापती विजय यांचं सरकार कोसळू शकते, त्यामुळे तामिळनाडूत कधीही निवडणुका लागू शकतात, असा दावा माजी मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी केला आहे. टीव्हीके हा सर्वसामान्यापर्यंत पोहचलेला पक्ष नाही, हा पक्ष सोशल मीडियावर प्रभावित झालेला आहे, असेही ते म्हणाले. जोसेफ विजय यांचं सरकार कधीही कोसळू शकते, असा दावा तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी केला आहे. त्यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना निवडणुकीची तयारी कऱण्याच्या सूचना केल्या आहेत. स्टॅलिन यांच्या वक्तव्यावर विजय यांच्या टीव्हीके पक्षाकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. याआधी डीएमकेच्या आमदारानेही विजय यांचं सरकार सहा महिन्यात कोसळेल असा दावा केला होता.
एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, माजी मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी आपल्या जिल्हा सचिवांना पोट निवडणुकीची तयारी करण्याचे आदेश दिले आहेत. ते म्हणाले की, सध्याचे सरकार कधीही कोसळू शकते. त्यामुळे आपल्या पक्षाने कोणत्याही क्षणी होणाऱ्या निवडणुकांसाठी तयार राहिले पाहिजे. हा पराभव तात्पुरता आहे. सध्याचे सरकार कधीही कोसळू शकते. तयार राहा. २०२९ च्या लोकसभा निवडणुकांसोबत पुन्हा विधानसभा निवडणुका होण्याची शक्यता आहे. आम्ही परत येऊ आणि पुन्हा जिंकू.
सरकारला पाठिंबा देणाऱ्या व्हीसीके, सीपीआय, सीपीएम आणि आययूएमएल या पक्षांनी आपला पाठिंबा काढून घेतल्यास राज्यातील राजकीय अस्थिरता निर्माण होऊ शकते. तसेच तामिळनाडूमधील न्यायालयाने बंडखोर एआयएडीएमके आमदारांना अपात्र ठरवल्यास अशीच परिस्थिती निर्माण होऊ शकते, असेही म्हटल्याचे रिपोर्टमध्ये आहे. दरम्यान, विजय यांच्या टीव्हीके पार्टीने सर्वसामान्यांमध्ये, गावखेड्यात कोणतेही काम केलेले नाही. हा पक्ष फक्त सोशल मीडियामुळे सत्तेत आला आहे, असे स्टॅलिन यांनी आपल्या कार्यकर्त्यांना सांगितले.


