लेक रेवतीच्या लग्नात सुप्रिया सुळे भन्नाट थिरकल्या; ‘पुरा लंदन ठुमकदा…व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांची कन्या रेवती सुळे हिचा विवाह २० जून रोजी मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये मोठ्या थाटामाटात पार पडला. फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीलाच सुप्रिया सुळे यांनी रेवती आणि सारंग लखानी यांच्या विवाहाची बातमी समाज माध्यमांवर शेअर केली होती. त्यानंतर त्यांनी स्वतः अनेक पाहुण्यांना वैयक्तिक भेटून लग्नाची आमंत्रण पत्रिका दिली. त्यामुळे गेल्या चार-पाच महिन्यांपासून सुळे-पवार कुटुंबात रेवतीच्या लग्नाची मोठी धूम सुरू होती.

राजकारणात नेहमीच सक्रिय असणाऱ्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आपल्या लेकीच्या लग्नासाठी खास सुट्टी घेतल्याचे दिसून आले; कारण लग्नाच्या संपूर्ण नियोजनात त्यांनी कुठेही कसर ठेवली नव्हती. संसदेत मतदारसंघाचे प्रश्न हिरीरीने मांडणाऱ्या, विविध राजकीय मुद्द्यांवर नेहमीच आक्रमकपणे बोलणाऱ्या आणि सतत दौऱ्यांवर असणाऱ्या सुप्रिया सुळे यांचे एक वेगळेच रूप या लग्नसोहळ्यात पाहायला मिळाले. आपल्या लाडक्या लेकीच्या संगीत कार्यक्रमात त्यांनी स्वतः उत्साहाने ठेका धरला. त्यांच्या या नृत्याचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.

या सांगीतिक कार्यक्रमात उपस्थित सर्वांनीच मनसोक्त आनंद लुटला. जय पवार, पार्थ पवारांसह संपूर्ण कुटुंबाने रेवतीच्या आनंदात उत्साहाने सहभाग घेतला. या सोहळ्यात सुप्रिया सुळे यांच्या डान्सने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. पोपटी रंगाच्या सुंदर साडीत त्यांनी ‘पुरा लंदन ठुमकदा’ आणि ‘ताल से ताल मिला’ या लोकप्रिय गाण्यांवर अप्रतिम नृत्य केले. लेकीच्या सुखासाठी थिरकणाऱ्या एका आईच्या चेहऱ्यावरचा आनंद या संपूर्ण सोहळ्यात प्रकर्षाने ओसंडून वाहत होता.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles