अहिल्यानगर जिल्ह्याच्या मतदार यादीत १ लाख ४० हजार ७६६ मयतांची नावे

अहिल्यानगर-जिल्ह्यात सुरू असलेल्या मतदार यादी विशेष सखोल पुनरिक्षण मोहिमेमध्ये (एसआयआर) आत्तापर्यंत असंकलित मतदारांची संख्या ४ लाख २६ हजार ११३ आढळली आहे. त्यामध्ये १ लाख ४० हजार ७६७ मतदार मयत, ६० हजार ८४१ मतदारांची नावे दुबार तर उर्वरित २ लाखावर मतदार हे कायम स्वरूपी स्थलांतरित झालेली आहेत किंवा त्यांचा बीएलओ व त्यांना मदत करणाऱ्या राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांना शोध लागलेला नाही.

दरम्यान, जिल्ह्यात आढळून आलेल्या असंकलित मतदारांचे एकूण मतदारांशी असलेले प्रमाण ११.१८ टक्के इतके आहे तर नगर शहरात हेच प्रमाण जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजे २२ टक्के आहे. यात सर्वात कमी अकोलेमध्ये ५.९३ टक्के प्रमाण असल्याची माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुनील गाडे यांनी दिली.
जिल्ह्यात १२ विधानसभा मतदारसंघ आहेत, त्यापैकी सगर शहर, कर्जत-जामखेड, श्रीरामपूर, शिव कोपरगावा पाच मतदारसंघाचे एसआयआरचे काम १०० टक्के पूर्ण झाले आहे, उर्वरित मतदारसंघांचे देखील १८ टक्के पेक्षा अधिक काम पूर्ण झाले असून लवकरच अहिल्यानगर जिल्लाचे शंभर टके काम पूर्ण होईल असा विश्वास गादे यांनी व्यक केला. दरम्यान एसआयआर मोहिमेला निवडणूक आयोगाने दुसन्यांदा मुदतवाढ दिली आहे.

जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्या मार्गदर्शनाखाली एसआयआरचे काम विन्द्यात सुरू आहे. जिल्ह्वात एकूण ३८ लाख १० हजार १०२ मतदार आहेत. त्यापैकी असंकलित मतदार संख्या ४ लाख २६ हजार १९३ इतकी आहे. अशा संकलित मतदारांची बादी प्रत्येक मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांच्याकडे देण्यात आली आहे. तसेच राजकीय पांच्या महदान केंद्रस्तरीय सहाय्यकांनाही (बीएलए) स्था देण्यात आल्या आहेत. या याद्यांसंदर्भात राजकीय पक्षाच्या सहाव्यकांबरोबर बैठका घेण्याच्या सूचनाही बीएलओ बांना देण्यात आल्या आहेत. मतदान केंद्राचे डिजिटायझेशनचे काम शंभर टक्के पूर्ण झाल्यानंतर मयत दुबार कायमस्वरूपी स्थलांतरित मतदारांच्या राधा स्थानिक स्तरावर, तत्तुका पातळीवर व जिल्हा स्तरावरील संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहेत, यासंदर्भात दावे, हरकती दाखल करण्यासाठी २४ ऑगस्ट ते २३ सप्टेंबर ही सुधारित मुदत देण्यात आली आहे. २२ ऑक्टोवरपर्यंत असे दावे व हरकती निकली काढण्यासाठी मुदत असल्याचे उपजिल्हा निवडणूक अधिकारी गाडे यांनी सांगितले.

मतदार घराचा क्रमांकाची माहिती घेणार

राज्य मुख्य निवाणूक अधिका-यांच्या आदेशानुसार मतदार वादीतील मतदारांच्या नावासमोर घर क्रमांकाचा तपशील अचूक दर्शवण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थेस मतदारांचे अचूक घर क्रमांक देण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. याशिवाय मतदान केंद्राचे सुसूत्रीकरण करताনা किया नगदैन मतदान केंद्र प्रस्तावित करताना ज्या शाळेत असे मतदान केंद्र ठेवण्यात येईल त्या शाळांचे-डायस कोड नमूद करण्याबाबत देखील राजा मुख्य निवडणूक अभिवायांनी आदेश दिले आहेत. त्यानुसार मतदान केंद्राच्या सुसूत्रीकरणाची कार्यवाही सुरू केल्याचे गाडे यांनी सांगितले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles