उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपचे मंत्री गणेश नाईक हे कायम आमने-सामने असतात. गणेश नाईक हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत,
गणेश नाईक यांनी नवी मुंबईतील भूखंडावरून थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना इशारा दिला आहे. त्यामुळे वातावरण तापण्याची शक्यता आहे. नवी मुंबईकरांच्या सुविधेसाठी मी भूखंड मागितले होते, हॉस्पिटल, गार्डन यासाठी आम्ही भूखंडांची मागणी करत आहोत, आणि ते जर मिळत नसतील तर मंत्रिपद काय चाटायचं आहे का? असा सवाल यावेळी गणेश नाईक यांनी केला आहे.
नवी मुंबईकरांच्या सुविधेसाठी मी भूखंड मागितले होते, हॉस्पिटल, गार्डन यासाठी आम्ही भूखंडांची मागणी करत आहोत, आणि ते जर मिळत नसतील तर मंत्रिपद काय चाटायचं आहे का? असा सवाल नाईक यांनी उपस्थित केला आहे. पुढे बोलताना त्यांनी म्हटलं की, नवी मुंबईकरांचे सर्व भूखंड बिल्डरांच्या घशात घालण्याचं काम दलालांनी केलं आहे. मला या गोष्टीची लाज वाटते की मी ज्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री आहे, त्या मंत्रिमंडळाच्या नगरविकास खात्यामधील लोकांकडून असं काम होत आहे. माझा रागा शांत करायचा असेल तर सर्व भूखंड परत करा असा इशाराही यावेळी नाईक यांनी दिला आहे.


