नवनीत राणांना मिळणार मोठं गिफ्ट?मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची राणा यांनी घेतली भेट

राज्यसभेच्या 24 रिक्त जागा आणि पोटनिवडणुकीसाठी निवडणूका जाहीर झाल्या आहेत. यामध्ये आंध्र प्रदेश, गुजरात आणि कर्नाटकमधून प्रत्येकी 4, राजस्थान आणि मध्य प्रदेशमधून प्रत्येकी 3, झारखंडमधून 2 आणि मणिपूर, मेघालय, अरुणाचल प्रदेश व मिझोराममधून प्रत्येकी 1 जागेचा समावेश आहे. याव्यतिरिक्त, महाराष्ट्रातील (सुनेत्रा पवार यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेली) आणि तामिळनाडूमधील एका जागेसाठी पोटनिवडणूक देखील याच दिवशी होईल.माजी खासदार नवनीत राणायांचा राज्यसभेची उमेदवारी मिळवण्यासाठीचा प्रयत्न सुरु असल्याची माहिती समोर येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोट्यातून राज्यसभेची उमेदवारी लवकरच जाहीर केली जाणार आहे. यासाठी नवनीत राणा यांनी बुधवारी सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांची भेट घेतल्याचं सांगण्यात येत आहे. तर काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसयांची सुद्धा नवनीत राणा आणि रवी राणा यांनी भेट घेतली.

सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपद स्वीकारल्यानंतर राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा दिला होता. राष्ट्रवादीची राज्यसभेतील हीच एक जागा सध्या रिक्त आहे. सुनेत्रा पवार यांच्या राजीनाम्यानंतर राज्यसभेच्या या जागेवर कोणाची वर्णी लागणार, याविषयी राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवले जात होते. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांची देखील राज्यसभेच्या जागेसाठी चर्चा रंगली होती.

राज्यसभेच्या निवडणुकांचे संपूर्ण वेळापत्रक
नामांकन दाखल करण्याची अंतिम तारीख 8 जून 2026
नामांकनांची छाननी 9 जून 2026
उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख 11 जून 2026
मतदानाची तारीख (18 जून 2026 (सकाळी 9 ते दुपारी 4)
मतमोजणी व निकाल 18 जून 2026 (सायंकाळी 5 वाजेपासून)

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles