राष्ट्रवादी पक्षात फूट पडणार….२२ आमदार शरद पवार गटात सहभागी होणार;उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार म्हणाल्या…..

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाची मंगळवारी सायंकाळी उशिरा बैठक पार पडली. या बैठकीत पक्षाची बदनामी करणाऱ्यांना सडेतोड उत्तर द्या. पक्षाची बदनामी थांबवण्यासाठी वरिष्ठ नेत्यांनी ठामपणे आपली भूमिका मांडावी. पक्षात कोणतीही फूट पडणार नाही, पक्ष एकसंध आहे, असा संदेश लोकांपर्यंत पोहोचवा, अशा सूचना उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष सुनेत्रा पवार यांनी वरिष्ठ नेत्यांना दिल्या.

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे आमदार, मंत्री आणि पदाधिकारी यांची बैठक मंगळवारी सायंकाळी उशिरा पार पडली. पक्षात फूट पडणार असल्याचा रोहित पवार यांचा आरोप आणि ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या पदावरून निर्माण झालेल्या संभ्रमानंतर झालेली ही पक्षाची पहिलीच बैठक होती.

बैठकीच्या सुरुवातीलाच सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्या पदाविषयी निर्माण झालेल्या संभ्रमाबाबत सुनेत्रा पवार यांनी सारवासारव केली. पक्षात ज्येष्ठ नेत्यांचा योग्य सन्मान केला जाईल, असेही त्या म्हणाल्या.

पक्षात फूट पडणार आहे, २२ आमदार शरद पवार गटात सहभागी होणार आहेत, असे सांगून पक्षाची बदनामी केली जात आहे, त्यांना सडेतोड उत्तर द्या. पक्षात कुठली फूट पडणार नाही. पक्ष एकसंध आहे, असा संदेश समाजात गेला पाहिजे. त्या विषयी वरिष्ठ नेत्यांनी माध्यमांमध्ये बोलले पाहिजे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. माध्यमांमध्ये पक्षाची भूमिका मांडण्याची जबाबदारी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, ज्येष्ठ नेते प्रकाश सोळंके, छगन भुजबळ, अनिल पाटील यांच्यावर सोपविण्यात आली.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles