IPL 2026… पहिल्या क्वालिफायर सामन्यात फलंदाज झाला विचित्र पद्धतीने बाद… व्हिडिओ व्हायरल

Ipl 2026 च्या पहिल्या क्वालिफायर सामन्यात गुजरात टायटन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) यांच्यात एक अतिशय थरारक आणि वेगळीच घटना पाहायला मिळाली. धरमशाला येथील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळवल्या गेलेल्या या सामन्यात गुजरातचा फलंदाज साई सुदर्शन आयपीएल इतिहासातील सर्वात विचित्र पद्धतीने बाद झाला, ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

https://x.com/StarSportsKan/status/2059317297177874678?s=20

जेकब डफीने टाकलेला चेंडू शॉर्ट ऑफ गुड लेंथ होता आणि तो डाव्या हाताच्या सुदर्शनपासून बाहेर जात होता. सुदर्शनने बॅकफूटवर जाऊन त्यावर एक जोरदार कट शॉट मारला आणि चेंडू पॉईंटच्या दिशेने सीमारेषेकडे गेला. शॉट पूर्ण केल्यानंतर, साई सुदर्शनच्या हातातून बॅट निसटली. ती बॅट हवेत फिरत थेट मागे जाऊन पडली आणि उसळी मारून सरळ स्टंप्सवरजाऊन आदळली. सुदर्शनचे लक्ष चेंडूकडे होते आणि तो धावण्यासाठी पुढे निघाला होता. जेव्हा त्याने मागे वळून पाहिले, तेव्हा स्टंप्सवरील बेल्स पडल्या होत्या. अत्यंत दुर्दैवी आणि विचित्र पद्धतीने बाद झाल्यामुळे सुदर्शनने निराश होऊन आपले डोळे बंद केले. साई सुदर्शन अवघ्या 9 चेंडूत 3 चौकारांच्या मदतीने 14 धावा करून बाद झाला. जेकब डफीला ही विकेट अगदी गिफ्ट म्हणून मिळाली.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles