अजित पवार गटाच्या नेत्याकडून महिलेचा विनयभंग; विधवेकडे केली शरीरसुखाची मागणी

बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नगरसेवकाच्या विरोधात विनयभंगाच्या गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नगरसेवकाने एका विधवा महिलेकडे शरीरसुखाची मागणी केल्याची घटना बारामतीत घडली आहे. फोटो व्हायरल करण्याची धमकी देत महिलेकडे शरिरसुखाची मागणी केली असं तक्रारीत म्हटलंय. किशोर आप्पासाहेब मासाळ असं गुन्हा दाखल झालेल्या नगरसेवकाचे नाव आहे. विधवा महिलेचा छळ करून पीडित महिलेच्या घरात जबरदस्तीने घुसून तिचा विनयभंग करणे, मारहाण करणे,तिचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देणे, याशिवाय संबंधित महिलेला उद्योजकांकडून खंडणी वसूल करायला लावण्यासाठी तिच्यावरती दबाव टाकेन, असे विविध आरोप किशोर मासाळ यांच्यावरती करण्यात आलेत.बारामती तालुका पोलीस ठाण्यात संबंधित पीडितेच्या तक्रारीवरून किशोर मासाळ याच्या विरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, १३ फेब्रुवारी २०२६ ते २५ मे २०२६ या कालावधीत हा प्रकार घडलाय. पीडित महिलेच्या पतीचे निधन झाले असल्याने ती विधवा आणि असहाय्य असल्याचा गैरफायदा आरोपीने घेतला. ओळख असल्याचा फायदा घेऊन आरोपीने वेळोवेळी महिलेच्या घरात अनधिकृतपणे प्रवेश केला. तिथे त्याने महिलेकडे शरीरसुखाची मागणी करत तिचा विनयभंग केला.

आरोपीने पीडित महिलेला धमकावत, “तू बारामती येथील उद्योजकांना ब्लॅकमेल करून त्यांच्याकडून मला पैसे काढून दे, नाहीतर तुझे फोटो सोशल मीडियावर टाकून तुझी बदनामी करीन,” अशी धक्कादायक धमकी दिली. या मानसिक आणि शारीरिक छळाला कंटाळून पीडितेने बारामती तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पीडित महिलेच्या तक्रारीवरून बारामती तालुका पोलीस ठाण्यात किशोर आप्पासाहेब मासाळ याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles