नगर मनपा निवडणूक राष्ट्रवादीची जोरदार तयारी ;शहरात निकृष्ट विकास कामे भ्रष्टाचार, गुंडगिरी याविरुद्ध उमेदवार लढणार

राष्ट्रवादी पक्षाने रणशिंग फुंकली! आगामी महापालिका निवडणुकीसाठी नवी रणनीती तय

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- राष्ट्रवादी भवन येथे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या वतीने आयोजित राष्ट्रवादी विजय संकल्प मेळावा जिल्हाध्यक्ष दादाभाऊ कळमकर यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात पार पडला. आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या या महत्त्वपूर्ण बैठकीला कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती लाभली. बैठकीला शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर, विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष निलेश मालपाणी, महिला शहराध्यक्षा नलिनी गायकवाड, कार्याध्यक्ष नामदेव पवार, संजय झिंजे, अनिकेत कराळे, चंद्रकांत उजागरे, सचिन नवगिरे, प्रकाश पोटे, नीताताई बर्वे, ऍड. शितोळे, फारूक रंगरेज, खुशी जाधव, रोहन शेलार,भिमराज कराळे,अक्षय भगत, दीपक सुडके, अभिषेक जगताप, नूर पठाण,चैतन्य ससे ,समीर पठाण, फराज पठाण, प्रशांत दरेकर,राहुल घोरपडे यांच्यासह विविध सेलचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मेळाव्यात तरुण कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्साहपूर्ण वातावरण निर्माण केले. या बैठकीत पक्षाच्या पुढील निवडणूक रणनीतीसंदर्भात महत्त्वपूर्ण चर्चा झाली.
यावेळी जिल्हाध्यक्ष दादाभाऊ कळमकर म्हणाले की, विजय संकल्प मेळाव्यात कार्यकर्त्यांची झालेली उत्स्फूर्त उपस्थिती पाहून पक्षाची ताकद पुन्हा स्पष्ट झाली. आगामी महानगरपालिका निवडणुकीत स्थानिक प्रश्नांवर प्रामाणिकपणे काम करणाऱ्या उमेदवारांना संधी देणार आहोत. महाविकास आघाडीसोबत लढण्याचा विचार असून, गरज पडल्यास स्वबळावरही आम्ही सक्षम आहोत. निष्ठावंत कार्यकर्त्यांना योग्य प्रतिनिधीत्व मिळेल याची हमी दिली. तर
शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर म्हणाले की, महानगरपालिका निवडणूक ही स्थानिक प्रश्नांवर लढविली जाणारी निवडणूक आहे. नागरिकांचे प्रश्न प्रामाणिकपणे सोडवू शकणाऱ्या उमेदवारांनाच संधी दिली जाईल. १७ प्रभागांमध्ये महाविकास आघाडी व अन्य मित्रपक्षांसोबत निवडणूक लढविण्याचा विचार आहे. वेळ आली तर पक्ष स्वबळावर लढण्यासही पूर्णत तयार आहे. विधानसभेत पक्षासोबत निष्ठा ठेवून काम करणाऱ्यांना येणाऱ्या निवडणुकांमध्ये योग्य संधी दिली जाईल.निकृष्ट विकासकामे,शून्य नियोजन,भ्रष्टाचार,गुंडगिरी या विरुद्ध आमचे उमेदवार लढणार
लवकरच पक्षाध्यक्ष शशिकांत शिंदे व आमदार रोहित पवार यांच्या उपस्थितीत सविस्तर रणनीती बैठकीचे आयोजन केले जाईल.

बैठकीदरम्यान अनेक इच्छुक उमेदवारांनी स्वतःची ताकद दाखवण्यासाठी मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांसह उपस्थिती दर्शविली.
राष्ट्रवादीच्या विजय संकल्प मेळाव्यामुळे आगामी महानगरपालिका निवडणुकीचा ताप वाढला असून पक्ष आता सक्रिय तयारीसह रणनिती अंतिम करण्याच्या प्रक्रियेत आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles