राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची मुंबईत अहिल्यानगर जिल्ह्याची आढावा बैठक , जिल्हा बँकेबाबत चाचपणी

मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार पक्षाकडून अहिल्यानगर जिल्ह्याचा आढावा…
संघटनात्मक बांधणी, तालुकानिहाय आढावा आणि जनतेच्या प्रश्नांवर सविस्तर चर्चा

अहिल्यानगर :- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरदचंद्रजी पवार, पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा खा. सुप्रियाताई सुळे, प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे प्रदेश सरचिटणीस आमदार रोहितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत, आज मुंबई येथील प्रदेश कार्यालयात अहिल्यानगर शहर व ग्रामीण जिल्ह्याची आढावा बैठक पार पडली. या बैठकीस जिल्हा निरीक्षक अंकुश काकडे, जिल्हाध्यक्ष ॲड.संदीप वर्पे, दक्षिणचे जिल्हाध्यक्ष सिताराम काकडे, शहर कार्याध्यक्ष नामदेवराव पवार, अनिकेत कराळे, आदी उपस्थित होते..

पक्षाचे प्रदेश पदाधिकारी सरचिटणीस रवींद्र पवार, सरचिटणीस अदिती नलवडे, सामाजिक न्याय विभागाचे प्रदेशाध्यक्ष पंडित कांबळे, अल्पसंख्यांक प्रदेशाध्यक्ष अफजल फारुख,युवक प्रदेशाध्यक्ष महबूब शेख, अल्पसंख्यांक कार्याध्यक्ष वारिस खान, ओबीसी प्रदेशाध्यक्ष राज राजापूरकर, सेवादल प्रदेशाध्यक्ष गिरीश सामंत, समन्वयक सुहास उभे, विद्यार्थी माजी प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, युवती प्रदेशाध्यक्ष अमृता काळदाते, मनाली भिलारे आदी उपस्थिती होते.

या बैठकीत अहिल्यानगर जिल्ह्यातील तालुकानिहाय संघटनात्मक कामकाजाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. खा.शरदचंद्र पवार साहेब, खा.सुप्रियाताई सुळे, प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी जिल्ह्यातील संघटनात्मक परिस्थिती जाणून घेत उपस्थित पदाधिकारी संवाद साधला. जिल्ह्यातील विविध स्थानिक समस्या व विविध प्रश्नांबाबत माहिती जाणून घेऊन जनतेच्या प्रश्नांवर पक्षाची भूमिका स्पष्ट करत त्यासाठी आवश्यक त्या सूचना व मार्गदर्शन करण्यात आले. अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकार बँक (ADCC Bank) आगामी होऊ घातलेल्या निवडणुकीबाबत माहिती घेतल्याचे समजते.

आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका विचारात घेऊन पक्षाची संघटनात्मक ताकद वाढविण्यासाठी तालुका, शहर, गाव आणि बूथ पातळीपर्यंत संघटना अधिक सक्रिय करण्यासोबतच जनतेच्या प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवून विरोधी पक्ष म्हणून सरकारच्या धोरणांवर जनतेच्या प्रश्नांना प्रभावीपणे वाचा फोडण्यावरही बैठकीत भर देण्यात आला.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles