10 लाख विद्यार्थी चिंतेत.. रद्द झालेली NEET फेर परीक्षा कधी? समोर आली महत्वाची Update

NEET परीक्षा 2026 चा पेपर फुटल्याचा गंभीर आरोप होत होता. त्यानंतर ही परीक्षा रद्द करण्यात आली आहे. मोठे पाऊल उचलण्यात आले. CBI ने आदेश देत थेट नीट परीक्षा 2026 ची सर्व प्रक्रिया थांबवण्याचे आदेश दिले. ज्यानंतर परीक्षा रद्द करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली. सीबीआयकडून पेपरफुटीसंदर्भात तपास केला जात आहे. नक्की कुठे पेपरफुटी झाली, कोण कोण सहभागी आहे, किती केंद्रांवर पेपर फुटले, नक्की किती लोकांचा सहभाग आहे, याचा तपास केला जाईल. मात्र, यादरम्यान परीक्षा प्रक्रिया सुरू ठेवणे योग्य नसल्याचे स्पष्ट शब्दात सीबीआयने म्हटले. पेपरफुटीबाबत धक्कादायक माहिती मिळत आहे. मोठे मासे जाळ्यात अडकण्याची शक्यता आहे. 3 मे 2026 रोजी देशभरात नीट परीक्षा 2026 घेण्यात आली. मात्र, पेपरफुटीचे आरोप केले जात होते. 10 लाखाच्या आसपास विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा नीट परीक्षा द्यावी लागणार आहे.

नीट परीक्षा एकदाची झाली असताना पुन्हा विद्यार्थ्यांना अभ्यासाला सुरूवात करावी लागणार आहे. नीट परीक्षा पेपरफुटी संदर्भात मोठे आंदोलन दिल्लीत विद्यार्थ्यांकडून करण्यात आले.

परीक्षेत राजस्थानमध्ये मोठ्या प्रमाणात पेपरफुटी झाल्याचे सांगितले जात आहे. नीट परीक्षा आता पुन्हा कधी आहे, हा प्रश्न विद्यार्थ्यांकडून विचारला जात आहे. मात्र, अद्याप नीट परीक्षेची तारीख जाहीर करण्यात आली नाहीये. लवकरच नीट परीक्षेची तारीख जाहीर केली जाईल

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles