“पेट्रोल, डिझेलच्या वापरात काटकसर करा असं पंतप्रधान सांगतात. ठीक आहे. मग हे आत्ताच का सुचलं ? पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ आणि इतर राज्यांच्या निवडणुकीत प्रचार, रोड शो करताना आणि देशभरातून लाखो माणसं त्या त्या राज्यात नेताना जे कोट्यवधी लिटर्स पेट्रोल, डिझेल वाया गेलं तेंव्हा का नाही सुचलं ?” असा सवाल मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विचारला आहे.
राज ठाकरे यांनी मोदी सरकारला कोंडीत पकडणारे प्रश्न विचारले आहेत. त्यावर आता भाजपने त्यांना उत्तर दिलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेला काटकसरीच आवाहन केल्यानंतर लगेच राज ठाकरे यांच्या पोटात दुखायला लागलं. खरंतर राज ठाकरे यांनी मोदींना सल्ला देण्याऐवजी आपल्या पक्षाच्या बाबतीत, पक्षाच्या धैय्य धोरणांसाठी, पक्ष वाढीसाठी एवढ मोठं टि्वट लिहिल असतं, तर जास्त फायदा झाला असता. परंतु राज ठाकरे आपल्या पक्षाची झालेली वाताहात पहायला तयार नाहीत. ते पंतप्रधान मोदींना सल्ला देत आहेत” अशी टीका नगरसेवक आणि भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी पेट्रोल-डिझेलचा वापर कमी करा, विजेवर चालणाऱ्या गाड्या जास्त वापरा असं सांगत आहेत. बरं, मग स्वतः पंतप्रधान आणि त्यांचे सगळे सहकारी देशभर काही शे गाड्यांचा ताफा घेऊन मिरवणुका काढत आहेत, स्वतःवर फुलं उधळून घेत आहेत त्याचं काय करणार आहात आपण ?” असा सवाल राज ठाकरेंनी विचारला आहे. “


