अजितदादांच्या विमान अपघातासंबंधी नवी माहिती ;खरा पायलट दुसराच होता, सुमित यांची ऐनवेळी नियुक्ती…

खरा पायलट दुसराच होता, सुमित यांची ऐनवेळी नियुक्ती…
अजितदादांच्या विमान अपघातासंबंधी नवी माहिती
दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या विमानाचा अपघात झाल्यानंतर वेगवेगळ्या शक्यता सांगितल्या जाऊ लागल्या आहेत. त्यातील एक म्हणजे पायलटची चूक. यात कॅप्टन सुमित कपूर (वय ६२) हे विमान चालवत होते. त्यामुळे त्यांच्याकडे बोट दाखविले जाऊ लागले आहे.
मात्र सुमित कपूर यांच्या मित्रांनी ही शक्यता पूर्णपणे फेटाळली आहे. त्यांच्या मते सुमित अतिशय अनुभवी पायलयटच नव्हे, तर बोईंग ७३७ परीक्षकही होते. परीक्षक होणे ही नागरी विमान वाहतूक क्षेत्रातील एक महत्त्वाची कामगिरी मानली जाते.
कपूर यांच्या आणखी एका मित्राने दावा केला की, त्या दिवशी विमान चालविण्यासाठी कपूर यांची नियोजित ड्युटी नव्हतीच. त्या विमानाचा पायलट वाहतुकीत अडकला होता. त्यामुळे अपघाताच्या काही तास आधी सुमित यांना अजित पवार यांना मुंबईहून बारामतीला निवडणूक रॅलीसाठी घेऊन जाण्याचे आदेश मिळाले. त्यानुसार ते गेले होते.
असे असले तरी सुमित वरिष्ठ आणि अनुभवी पायलट होते. ते गेल्या पाच वर्षांपासून व्हीएसआर एव्हिएशनमध्ये काम करत होते. सुमित यांचा मृतदेह त्याच्या ब्रेसलेटवरून ओळखण्यात आला. या अपघाताची सखोल चौकशी व्हावी, विनाकारण पायलटला दोषी ठरविले जाऊ नये, असे कपूर यांच्या मित्रांचे म्हणने आहे. कपूर अलीकडेच हाँगकाँगवरून परत आले होते.
सुमित यांच्या कुटुंबात त्यांची पत्नी, वृद्ध वडील, मुलगा शिव आणि मुलगी सान्या यांचा समावेश आहे. मुलगा आणि जावई देखील पायलट आहेत. कुटुंब लवकरच त्यांच्या नवीन घरात जाण्याची तयारी करत होते, त्यांच्या मुलाचे लग्न फेब्रुवारीमध्ये होणार होते. सुमित एप्रिलमध्ये ६३ वर्षांचे होणार होते. दोन-तीन वर्षांत निवृत्त होण्याचा त्यांचा विचार होता. सुमित यांच्यावर गुरुवारी दिल्लीतील पंजाबी बंगमध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles