कर्जतला पुन्हा राजकीय भूकंप ; नगराध्यक्षा रोहिणी घुलेंवर अविश्वास प्रस्ताव

नगरपंचायतच्या विद्यमान नगराध्यक्ष रोहिणी सचिन घुले यांच्या विरोधात 13 नगरसेवकांनी जिल्हाधिकारी यांना लेखी पत्र देत अविश्वास प्रस्ताव दाखल करत त्यांना या पदावरून काढून टाकावे अशी मागणी केली आहे. यामुळे कर्जत नगरपंचायत मध्ये पुन्हा एकदा राजकीय भूकंप झाला आहे.जिल्हाधिकारी यांच्याकडे कर्जत नगरपंचायतमधील तेरा नगरसेवकांनी नगराध्यक्ष रोहिणी सचिन घुले यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल केला आहे. प्रस्ताव दाखल करणाऱ्यांमध्ये गटनेते प्रा.सतीश उद्धवराव पाटील, सुवर्णा रवींद्र सुपेकर, उषा अक्षय राऊत, प्रतिभा नंदकिशोर भैलुमे, लंकाबाई देविदास खरात, छाया सुनील शेलार, अश्विनी गजानन दळवी, ताराबाई सुरेश कुलथे, मोनाली ओंकार तोटे, मोहनी दत्तात्रय पिसाळ, नामदेव चंद्रकांत राऊत, अमृत श्रीधर काळदाते, ज्योती लालासाहेब शेळके यांचा समावेश आहे.विद्यमान अध्यक्ष रोहिणी सचिन घुले या नगरपंचायतचे कामकाज पाहताना कायद्याची उल्लंघन करत असल्यामुळे त्यांनी विश्वास गमावला आहे. शासन नियमांचे पालन न करता स्वतःच्या सोयीनुसार मनमानी पद्धतीने कारभार करतात. प्रभागातील नागरिकांच्या समस्या सोडवण्याची मागणी केल्यानंतर नगराध्यक्षा घुले विश्वासात न घेता मनमानी पद्धतीने कामकाज करतात. लोकांच्या सेवेसाठी आवश्यक आरोग्य, दिवाबत्ती, शिक्षण, सांडपाणी, विल्हेवाट या सोयी सुविधा तातडीने मिळतील अशी व्यवस्था करण्याची मागणी केल्यास त्या मागणीकडे हेतूपूर्वक दुर्लक्ष करून टाळाटाळ करतात. यामुळे नागरिकांच्या समस्या सुटत नाही. यासह इतरही मुद्दे यामध्ये मांडून अविश्वास प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्याकडे दाखल केला आहे.अविश्वास प्रस्ताव दाखल केल्यामुळे कर्जत तालुक्यात मोठा राजकीय भूकंप झाला आहे. हा अविश्वास प्रस्ताव मंजूर होणार का याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांची भूमिका निर्णायक हा अविश्वास प्रस्ताव दाखल केल्यानंतर तो मंजूर होणार की नाही याबाबत प्रा. राम शिंदे यांची भूमिका महत्त्वाची आणि निर्णायक आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles