मतदार यादीत नाव टाकायचे 2,500 रुपये द्या! लाच मागणारा BLO एसीबीच्या जाळ्यात

सरकारी कार्यालयात काम करून घेण्यासाठी विविध विभागातील अधिकाऱ्यांकडून लाच मागून ती स्वीकारताना आणि त्या संदर्भातील कारवाईही आपण पाहिले असेल, पण परभणीत चक्क मतदार यादीत नाव टाकण्यासाठी 2,500 रुपयांची लाच मागणाऱ्या सहशिक्षकाच्या मुसक्या एसीबीने (ACB) आवळल्या आहेत. रामेश्वर विलास काळे असे या सह शिक्षकाचे नाव असून ते परभणी शहरातील प्रेरणा विद्यानिकेतन शाळेत कार्यरत आहे.परभणी विधानसभा मतदारसंघात BLO म्हणून काम करत असलेले रामेश्वर काळे हे SIR फॉर्म अंतर्गत 2002 च्या मतदार यादीत नाव नसल्याने मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी एका कुटुंबाला 2500 रुपयांची लाच मागितली. मात्र सदर कुटुंबाने बीएलओने अडीच हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याची तक्रार एसीबीकडे केली. या तक्रारीची पंचासमक्ष पडताळणी करण्यात आली. त्यानंतर परभणी शहरातील बालाजी भोजनालय स्टेशन रोड परिसरात सापळा रचण्यात आला. यावेळी आरोपी रामेश्वर काळे याने तक्रारदाराकडून दोन हजार रुपयांची लाचेची रक्कम स्वीकारली. त्याचवेळी एसीबीच्या पथकाने त्याला रंगेहाथ पकडलं.

दरम्यान, या प्रकरणी परभणीतील नवा मोंढा पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 मधील कलम 7 अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. आरोपीला ताब्यात घेण्यात आलं असून पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. मात्र या घटनेनं परिसरात एकच चर्चा रंगू लागली असून आता याच कामासाठी लाच मागायची बाकी होते, अशी प्रतिक्रिया नागरिक देत आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles