पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत दप्तर मिळणार, राज्य सरकारची मोठी घोषणा,

राज्यातील इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी एक आनंदवार्ता समोर आली आहे. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना आता मोफत दप्तर मिळणार आहे. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांतील इयत्ता 1ली ते 8वीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘मोफत शालेय दप्तर योजना’ शालेय शिक्षण विभागाने राबवण्यासंदर्भात शासन निर्णय जारी केला आहे. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांतील इयत्ता 1ली ते 8वीपर्यंत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य पुरवणे या उपक्रमांतर्गत मोफत शालेय दप्तर पुरविण्यासंदर्भात प्राथमिक शिक्षण संचालनायांनी निर्णय घेतला असल्याची माहिती आहे.

दरम्यान, शासनास सादर केलेल्या 174 कोटी 19 लाख 35 हजार 424 इतक्या रकमेच्या प्रस्तावास अटी व शर्तीच्या अधीन राहून शासनाची प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. अशातच राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या इयत्ता 1 ली ते 5 वी व इयत्ता 6 वी ते 8 वी पर्यंतच्या शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांची संख्या विचारात घेऊन दप्तर पुरविण्यासाठी वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयामधील विहित अटी, शर्तीच्या अधीन राहून ई-निविदा राबवून खरेदी प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे. तर घेत असलेल्या विद्यार्थ्यांना दप्तरच्या किंमतीमध्येवरील बाबीसाठी वेगवेगळ्या किंमती दर्शविणार असल्यास संबंधित निविदा विचारात घेतली जाणार नाही, अशी देखील माहिती आहे. विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य पुरविणे (सायन्स कीट, प्रयोगशाळा साहित्य, डेस्क बेंच, शैक्षणिक साहित्य इ.) या योजनेसाठी प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली आहे.

दरम्यान, त्या अनुषंगाने राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या इयत्ता 1ली ते 5 वी आणि इयत्ता 6 वी ते 8वी पर्यंत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना दप्तर पुरविण्यासाठी ई-निविदा प्रक्रियेचे प्रारूप शिक्षण संचालक (प्राथमिक), प्राथमिक शिक्षण संचालनालय, पुणे यांनी तयार करून शासन पातळीवर मान्यता घेतली जाणार असल्याची माहिती आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles