अहिल्यानगर जिल्ह्यात आरोग्य विभागात 5,223 नवीन पदभरतीचा मार्ग मोकळा

अहिल्यानगर -श्रेणीवर्धित व नवनिर्मित आरोग्य संस्था पूर्ण क्षमतेने सुरू करण्यासाठी आवश्यक त्या वैद्यकीय अधिकार्‍यांची व कर्मचार्‍यांची पदनिर्मिती व पदभरती टप्प्याटप्प्याने राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत राबविण्यात येत आहे. एकूण 7,955 पदांच्या आवश्यकतेपैकी उच्चस्तरीय सचिव समितीने यापूर्वी मंजूर केलेल्या 2,732 पदांचा अपवाद करून, 5,223 नवीन पदे निर्माण करण्यास आणि राज्यातील एकूण 259 नवीन स्थापित किंवा श्रेणीसुधारित आरोग्य संस्थांचे (ज्यांचे बांधकाम 50% किंवा त्याहून अधिक पूर्ण झाले आहे) कामकाज सुरू करण्यास याद्वारे मान्यता देण्यात आली आहे.

सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत राज्यभरात विविध आरोग्य संस्थांची स्थापना किंवा श्रेणीसुधारणा करण्यास मान्यता देण्यात आली आहे. उच्चस्तरीय सचिव समितीने ज्या संस्थांच्या बांधकामाचे किमान 50% काम पूर्ण झाले आहे अशा 259 आरोग्य संस्थांसाठीच्या कर्मचारी आकृतीबंधास (स्टाफिंग पॅटर्न) मंजुरी दिली आहे; यामध्ये उपकेंद्रे, प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामीण रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये आणि जिल्हा रुग्णालये यांचा समावेश आहे.

श्रेणीवर्धित व नवनिर्मित आरोग्य संस्था पूर्ण क्षमतेने सुरू करण्यासाठी अहिल्यानगर येथील आयुष रूग्णालय, कर्जत, जामखेड, दौंड उपजिल्हा रूग्णालय, राहुरी तालुक्यातील चेडगाव, संगमनेरातील कुरंकडी, कौठे बुद्रुक, श्रींगोद्यातील मुंगूसवाडी, कर्जतमधील म्हळंगी उपकेंद्र, तर नेवाशातील भेंडा बुद्रुक, पारनेरातील राळेगणसिध्दी नवीन बिगर आदिवासी प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच श्रींगोद्यातील कोळगाव नवीन ग्रामीण रूग्णालय येथे पदभरतीस मान्यता देण्यात आली आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles