Saturday, March 7, 2026

राज्य शासनाने मद्याच्या किमतीत केलेली दरवाढ रद्द करण्याची मागणी ; नगर जिल्ह्यात परमिटरूम चालकांचा आंदोलनाचा इशारा

अहिल्यानगर: राज्य शासनाने मद्याच्या किमतीत केलेली दरवाढ व अतिरिक्त वॅट रद्द करावा, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा श्रीरामपूर तालुका परमिट रूम व वाईनशॉप ओनर्स सोशल असोसिएशनचे अध्यक्ष नाना जोंधळे यांनी दिला आहे.

संघटनेच्या बैठकीत बोलताना त्यांनी हा इशारा दिला. नाना जोंधळे म्हणाले, लाडकी बहीण योजनेसाठी सरकारकडे पैसे नाहीत. त्याचा भार परमिट रूमधारकांवर सरकार टाकीत आहे. यासाठी अतिरिक्त कर आकारणी लादली आहे. राज्यातील हॉटेल, परमिट रूम व वाईनशॉप व्यावसायिकांसाठी एकच कर प्रणाली असावी. तसे न करता राज्य सरकारने ती परमिट रूमवर केली आहे. ही अन्यायकारक करवाढ मागे घ्यावी, अन्यथा जिल्ह्यातील सर्व परमिट रूम चालक व मालक रस्त्यावर उतरून लोकशाही मार्गाने आंदोलन करतील.

राज्यातील मद्य उद्योग आर्थिक संकटात आहे. हॉटेल व्यवसायाला कोणतीही सवलत किंवा मदत दिली जात नाही. त्याचा परिणाम ग्राहक आणि हॉटेल व्यावसायिकांवर झाला आहे. हाॅटेल व परिमिटरुमवरील मद्यविक्रीवर अतिरिक्त व्हॅट लावल्याने अनधिकृत व बेकायदेशीर दारुविक्रीत वाढ झाली आहे. परवाना नसणाऱ्या हाॅटेल्स, धाब्यामधून सर्रास विक्री केली जात आहे. यामुळे व्यवसाय मोडकळीस येण्याची स्थिती उद्भवल्याचे श्री. जोंधळे यांनी सांगितले.
राज्य शासनाने मद्याच्या किमतीत केलेली दरवाढ व अतिरिक्त वॅट रद्द करावा. राज्यातील हॉटेल, परमिट रूम व वाईनशॉप व्यावसायिकांसाठी एकच कर प्रणाली असावी. लाडकी बहीण योजनेसाठी सरकारकडे पैसे नाहीत. त्याचा भार परमिट रूमधारकांवर सरकार टाकीत आहे. यासाठी अतिरिक्त कर आकारणी लादली आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles