राज्याच्य राजकारणाला हादरवाणारी बातमी समोर आली आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील आमदार संजय गायकवाड यांनी आमदार निवासातील कॅन्टीन कर्मचाऱ्याला बेदम मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे. निकृष्ट जेवण दिल्यामुळे संजय गायकवाड यांनी आमदार निवासातील कर्मचाऱ्याला अतिशय बेदम मारहाण केली. आकाशवाणी आमदार निवासात ही घटना घडली आहे. या मारहाणीचा व्हिडिओ प्रसिद्ध झाल्याने खळबळ उडाली आहे. संजय गाडकवाड कर्मचाऱ्याला चापटा अन् लाथांनी मारत असल्याचे व्हिडिओत दिसत आहे.पावसाळी अधिवेशनासाठी संजय गायकवाड सध्या मुंबईमध्ये आहेत. ते आकाशवाणी आमदार निवासात मुक्कामी होते. आमदार संजय गायकवाड यांचा आमदार निवासच्या कॅन्टीनमध्ये राडा पाहायला मिळालाय. आमदार निवासातील कॅन्टीनमध्ये निकृष्ट दर्जाचे आणि शिळे अन्न मिळाल्यामुळे संजय गायकवाड यांना राग अनावर आला. गायकवाड यांनी कॅन्टीनच्या कर्मचाऱ्याला थेट बुक्क्यांनी मारहाण केलीय. निकृष्ट जेवण दिल्याच्या कारणावरून कर्मचाऱ्याला ही मारहाण केलीय. आमदार संजय गायकवाड निकृष्ट जेवणाबाबत आज सभागृहात मुद्दा मांडणार आहेत.
सध्या पावसाळी अधिवेशन सुरू असल्याने गायकवाड हे आकाशवाणी आमदार निवासात राहत आहेत. मंगळवारी रात्री त्यांना शिळे आणि खराब जेवण दिल्याचा आरोप करत कॅन्टीन कर्मचाऱ्याला कानशिलात लगावली आणि ठोसे मारले. संतापलेल्या गायकवाड यांनी कॅन्टीन चालकालाही लक्ष्य केले. यासंदर्भात निकृष्ट जेवणाचा मुद्दा ते विधानसभेत मांडणार असल्याचे त्यांनी सांगितले.आमदार निवासात राहत असलेले शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांना जेवणाचा दर्जा खराब वाटल्याने ते चांगलेच संतापले. रागाच्या भरात ते फक्त टॉवेल आणि बनियान घालून थेट कॅन्टीनमध्ये दाखल झाले. तिथे त्यांनी कॅन्टीन कर्मचाऱ्याला भाजीचा वास घेण्यास सांगितला आणि खराब जेवण देण्याचा जाब विचारत कर्मचाऱ्याला मारहाण केली. या घटनेदरम्यान काही लोकांनी त्यांचा व्हिडिओ रेकॉर्ड केला.


