: देशभर गाजत असलेल्या नीट पेपरफुटीप्रकरणी आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक व्हिडीओ प्रसिद्ध करत संदेश दिला आहे. पंतप्रधान मोदींनी पेपरफुटी गंभीर विषय असल्याचे म्हणत, यासाठी फास्ट ट्रॅक कोर्ट स्थापन करण्याची सूचना दिल्याचे सांगितले. “फास्ट ट्रॅक कोर्ट आणि कठोर शिक्षेची तरतूद असलेल्या मसुद्यावर शुक्रवारी मंत्रिमंडळात चर्चा होऊन, संसदेत विधेयक मंजूर करण्यासाठी प्रयत्न केला जाईल”, असे आश्वासन पंतप्रधान मोदींनी दिले आहे.“मला कल्पना आहे की पेपरफुटी हा साधारण विषय नाही, लाखो विद्यार्थी आणि त्यांच्या जवळच्यांसाठी हा खूपच क्लेषदायक विषय आहे. त्यामुळे पेपरफुटीच्या पार्श्वभूमीवर गेल्या अडीच महिन्यात अनेक पाऊले उचलण्यात आली. गुन्हेगारांना पकडले असून, ते तुरुंगात आहेत. विद्यार्थ्यांचे एक वर्ष वाया जाऊ नये ही मोठी जबाबदारी आमच्यावर होती. लगेच परीक्षा घेणं फार गरजेचं होतं. सरकारने सर्व शक्तीचा वापर करुन, कमीत कमी वेळात, २२ लाख विद्यार्थ्यांची परीक्षा होईल यासाठी व्यवस्था केली. आणि ४-५ दिवसांपूर्वी १९ तारखेला निकाल देखील आला. यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांच्या बातम्या देखील समोर येत आहेत”,असे मोदी म्हणाले.“पण, आम्ही यावर समाधानी होणारी लोकं नाहीत. त्यामुळेच मी आज फास्टट्रॅक कोर्टसाठी विभागांना सूचना दिल्या होत्या. विभागांनी मेहनतीने तयार केलेला मसुदा रात्री उशीरा मला सादर केला. फास्ट ट्रॅक कोर्ट आणि कठोर शिक्षेची तरतूद असलेल्या या मसुद्यावर उद्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा होईल. मंत्रिमंडळातील सदस्यांनी दिलेल्या सूचना विचारात घेऊन त्याला अंतिम स्वरुप दिले जाईल. सोमवारपासून संसदेचा दुसरा आठवडा सुरु होत आहे, त्यात हे विधेयक मंजूर करण्याचा प्रयत्न केला जाईल”, असे नरेंद्र मोदी म्हणाले.


