अहिल्यानगर मध्ये पोलिसांची गुटख्याच्या तस्करी विरोधात मोठी कारवाई सिनेस्टाईल पाठलाग करून 51 लाखाचा मुद्दाम जप्त

अहिल्यानगर – गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांची अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनावर पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल ५१ लाख ४१ हजार ४८ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. यामध्ये सुमारे ४१ लाख ४१ हजार रुपयांचा प्रतिबंधित गुटखा व सुगंधी सुपारी तसेच १० लाख रुपये किमतीच्या आयशर टेम्पोचा समावेश आहे. ही कारवाई खर्डा पोलिसांनी केली आहे.
सोमवारी (दि. २४ ऑगस्ट) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास खर्डा पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक उज्वलसिंह राजपूत यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, धाराशिवकडून बीडकडे शिर्डी-हैदराबाद राज्य महामार्गावरून एका आयशर टेम्पोमधून मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित गुटखा व तंबाखूजन्य पदार्थाची वाहतूक केली जाणार आहे. माहिती मिळताच पोलिसांनी जातेगाव फाटा, खर्डा येथे नाकाबंदी केली. यावेळी संशयित आयशर टेम्पो भरधाव वेगाने येताना दिसला. पोलिसांनी वाहन थांबविण्याचा इशारा केला; मात्र चालकाने वाहन न थांबवता बीडच्या दिशेने वेगाने पळ काढला.

यानंतर खर्डा पोलिसांनी तत्काळ पाठलाग सुरू केला. सिनेस्टाईल पाठलाग करत पोलिसांनी अखेर तेलंगशी गावच्या शिवारात संशयित टेम्पो ताब्यात घेतला. वाहनाची झडती घेतली असता त्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित गुटखा, तंबाखूजन्य पदार्थ व सुगंधी सुपारी आढळून आली.

या कारवाईत ४१ लाख ४१ हजार ४८ रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा व सुगंधी सुपारी तसेच १० लाख रुपये किमतीचा आयशर टेम्पो, असा एकूण ५१ लाख ४१ हजार ४८ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या प्रकरणी राजु मेहबुब शेख (रा. भेंडटाकळी, ता. गेवराई, जि. बीड), प्रदीप विष्णू गायकवाड (रा. च-हाटा फाटा, ता. जि. बीड) आणि तुषार नामदेव कुसळकर (रा. बीड) यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ मधील संबंधित कलमांसह अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम २००६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक अशोक खेडकर करीत आहेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles