नगर शहरात मोहरम उत्सव काळात सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट, अफवा पसरवल्यास कारवाई पोलिसांची नोटीस

मोहरम उत्सव काळात सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट नको; कोतवाली पोलिसांची ग्रुप ॲडमिनना नोटीस

अहिल्यानगर, 17 जून 2026: अहिल्यानगर शहरात दि. 17 जून 2026 ते दि. 26 जून 2026 या कालावधीत मोहरम उत्सव साजरा होणार आहे. या काळात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये व उत्सव शांततेच्या वातावरणात पार पडावा, यासाठी कोतवाली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी भारतीय नागरीक सुरक्षा संहिता कलम 168 अन्वये सोशल मीडिया व व्हॉट्सॲप ग्रुप ॲडमिनना नोटीस बजावली आहे.

ॲडमिनना 4 महत्त्वाच्या सूचना
पो.नि. देशमुख यांनी नोटीसमध्ये सोशल मीडिया ऑपरेटर व व्हॉट्सॲप ग्रुप ॲडमिन सदस्यांना खालील सूचनांचे काटेकोर पालन करण्याचे आदेश दिले आहेत:

1. आक्षेपार्ह व वादग्रस्त पोस्ट नको: सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट तसेच वादग्रस्त मजकूर लिहून व्हॉट्सॲप, इंस्टाग्राम व फेसबुक सारख्या सोशल मीडियावर प्रसारित करू नये.
2. तेढ निर्माण करणारी पोस्ट टाळा: सोशल मीडियावर दोन गटात, दोन समाजामध्ये, जाती धर्मात तेढ निर्माण होईल अशा पद्धतीने पोस्ट करू नये.
3. अफवांवर लक्ष ठेवा: आपले ग्रुपवर कोणतीही अफवा किंवा दोन समाजामध्ये तेढ निर्माण होईल अशा प्रकारचा मजकूर प्रसारित होणार नाही याची ॲडमिन म्हणून खबरदारी घ्यावी.
4. जातीय तेढीला प्रतिबंध: जातीय तेढ निर्माण होईल अशा प्रकारचे छायाचित्र अथवा मजकूर प्रसारित करू नये.

उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई
नोटीसमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे की, दिलेल्या सूचनांकडे दुर्लक्ष करून मोहरम उत्सव काळात शांततेस व सुव्यवस्थेस बाधा निर्माण झाल्यास त्यास सर्वस्वी संबंधित ॲडमिनला जबाबदार धरण्यात येईल. त्यांच्याविरुद्ध प्रचलित कायद्यानुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल व सदरची नोटीस न्यायालयात पुरावा म्हणून सादर करण्यात येईल.


सदरची नोटीस पो.नि. नितीन देशमुख यांनी दि. 17 जून 2026 रोजी जारी केली आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles