Saturday, November 15, 2025

पोस्टाची जबरदस्त योजना! एकदा गुंतवणूक करा अन् फक्त व्याजातून दर महिन्याला मिळवा ५५०० रुपये

प्रत्येकजण आपले भविष्य सुरक्षित करण्याचा प्रयत्न करतात. यासाठी फार आधीपासूनच वेगवेगळ्या योजनांमध्ये गुंतवणूक करतात. सरकारी योजनांमध्ये तुम्हाला सुरक्षित परतावा मिळतो. मॅच्युरिटीनंतर तुमच्या खात्यात पैसे असतात. जर तुम्हीही आतापासून गुंतवणूक केली तर तुम्हाला मॅच्युरिटीनंतर चांगला परतावा मिळतो. दर महिन्याला पैसे मिळतात.

पोस्ट ऑफिस मंथली इन्कम स्कीममध्ये गुंतवणूक केल्यावर तुम्हाला चांगला परतावा मिळतो. दर महिन्याला पैसे मिळतात. सेवानिवृत्तीनंतर तुम्हाला कोणतीही आर्थिक अडचण भासणार नाही. या योजनेत तुम्हाला दर महिन्याला एक ठरावीक रक्कम मिळते. आज आम्ही तुम्हाला पोस्ट ऑफिस मंथली इन्कम स्कीमबद्दल माहिती देणार आहोत.

पोस्ट ऑफिसच्या या योजनेत कोणत्याही वयोगटातील नागरिक लाभ घेऊ शकतात. या योजनेत तुम्हाला चांगला रिटर्न मिळतो. या योजनेत गुंतवणूकीवर सरकार स्वतः गॅरंटी देते. या योजनेत तुम्हाला १००० रुपये गुंतवून अकाउंट ओपन करु शकतात.

योजनेसाठी पात्रता

१८ वयापेक्षा जास्त वयोगटातील व्यक्ती

जॉइंट अकाउंट उघडू शकता.

या योजनेत १००० रुपयांची गुंतवणूक करुन अकाउंट ओपन करु शकतात.

पोस्ट ऑफिसच्या या योजनेत तुम्हाला चांगले व्याजदर मिळते. या योजनेत मॅच्युरिटी पीरियड ५ वर्षांचा आहे. या योजनेत गुंतवणूक केल्यावर १ वर्षापर्यंत तुम्ही पैसे काढू शकत नाही. या योजनेत गुंतवणूक केल्यावर रिटायरमेंटनंतर महिन्याला काही रक्कम मिळते.या योजनेत तुम्ही सिंगल आणि जॉइंट अकाउंट उघडू शकतात.

या योजनेत सिंगल अकाउंटमध्ये ९ लाखांपर्यंत गुंतवणूक करु शकतात. जॉइंट अकाउंटमध्ये जास्तीत जास्त १५ लाख रुपये गुंतवू शकतात.अकाउंट उघडल्यानंतर एक महिन्यानंतर मॅच्युरिटीनंतर व्याज मिळते.

महिन्याला ५५०० रुपयांचे व्याज

पोस्ट ऑफिसच्या या योजनेत फक्त व्याजातून ५५०० रुपयांची कमाई करु शकतात. या योजनेत जर तुम्ही सिंगल अकाउंटमध्ये ९ लाख रुपये जमा केले. तर त्यावर ७.४ टक्के व्याजदरानुसार दर महिन्याला ५५०० रुपये व्याज मिळार आहे. जर तुम्ही जॉइंट अकाउंट ओपन केले तर १५ लाख रुपयांच्या गुंतवणूकीवर दर महिन्याला ९,२५० रुपये व्याजदर मिळते.

पोस्ट ऑफिसच्या या योजनेत तुम्ही तिमाही, सहामाही किंवा वार्षिक आधारावर व्याजदर घेऊ शकतात. यासाठी तुम्हाला जवळच्या पोस्ट ऑफिसरमध्ये जाऊन अर्ज करायचा आहे. यासाठी अकाउंट ओपनिंग फॉर्म, केवायसी आणि पॅन कार्डची गरज भासणार आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles