प्राजक्त तनपुरेंचा भाजपात प्रवेश, मामा जयंत पाटलांची प्रतिक्रिया, म्हणाले आमच्यासाठी..

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे नेते तथा माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी आज (३० मे) भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. गेल्या काही दिवसांपासून प्राजक्त तनपुरे यांच्या भाजपा प्रवेशाच्या चर्चा सुरू होत्या. त्यानंतर आज अखेर प्राजक्त तनपुरे यांनी मुंबईत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, माजी खासदार सुजय विखे यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. प्राजक्त तनपुरे यांच्या भाजपा प्रवेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाला मोठा धक्का बसल्याचं बोललं जात आहे.

दरम्यान, प्राजक्त तनपुरे यांच्या भाजपा प्रवेशावर आता राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे नेते तथा माजी मंत्री जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया देत मोठं भाष्य केलं आहे.’प्राजक्त तनपुरे यांनी भाजपात प्रवेश करणं हे आमच्यासाठी धक्कादायक आहे’, असं जयंत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे.प्राजक्त तनपुरे यांनी भाजपात प्रवेश केला आहे. यावर तुमची प्रतिक्रिया काय? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. यावर बोलताना जयंत पाटील म्हणाले की, “प्राजक्त तनपुरे यांच्या भाजपा प्रवेशाबाबत मी देखील ऐकलं. मात्र, माझा त्यांच्याशी संपर्क झाला नाही. खरं म्हणजे प्राजक्त तनपुरे यांनी भाजपात प्रवेश करणं हे आमच्यासाठी धक्कादायक आहे. पण त्यांच्या मतदारसंघाची परिस्थिती पाहून प्राजक्त तनपुरे यांनी निर्णय घेतला असेल असं मला वाटतं”, असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles