सुपा हद्दीत वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश; दोन हॉटेलवर छापे, 5 महिलांची सुटका, 4 जण अटकेत

पारनेर-जिल्ह्यातील अवैध धंद्यांविरोधात सुरू असलेल्या मोहिमेंतर्गत पोलिसांनी सुपा पोलीस ठाणे हद्दीतील दोन हॉटेलवर छापे टाकून वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश केला. या कारवाईत पाच महिलांची सुटका करण्यात आली असून चार जणांना अटक करण्यात आली आहे. तर दोन मुख्य सूत्रधार फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या पथकाने ही कारवाई केली. स्थानिक गुन्हे शाखा आणि सुपा पोलीस ठाण्याच्या संयुक्त पथकाने गुरुवारी (दि. 19) सुपा हद्दीतील पळवे शिवारातील ओम साई हॉटेल आणि राखी पॅलेस लॉजिंग येथे छापे टाकले.

पोलिसांनी प्रथम बनावट ग्राहक पाठवून संबंधित ठिकाणी वेश्याव्यवसाय सुरू असल्याची खात्री केली. त्यानंतर छापा (Raid) टाकून ओम साई हॉटेलमधून सुनिल लक्ष्मण खोले (रा. नारायणगव्हाण, ता. पारनेर) व विनोद विलास मिडाळेकर (मूळ रा. बेळगाव, सध्या रा. ओम साई हॉटेल, पळवे) यांना ताब्यात घेतले. यावेळी दोन महिलांची (Woman) सुटका करण्यात आली. या प्रकरणातील संग्राम कांडेकर हा मुख्य आरोपी फरार आहे. त्यानंतर राखी पॅलेस लॉजिंगवर छापा टाकण्यात आला. यामध्ये दीपक सुनार आणि गोवर्धन ओमप्रकाश बुल या दोघांना ताब्यात घेण्यात आले. या ठिकाणाहून तीन महिलांची सुटका करण्यात आली. या प्रकरणातील वैभव साठे (रा. चास, ता. जि. अहिल्यानगर) हा आरोपी फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

या कारवाईदरम्यान आरोपींकडून एकूण 37 हजार रुपयांचा मुद्देमाल, ज्यामध्ये तीन मोबाईल फोन व रोख रक्कमेचा समावेश आहे, जप्त करण्यात आला. याप्रकरणी सुपा पोलीस ठाण्यात (Supa Police Station) भारतीय न्याय संहिता 2023 मधील कलम 99 तसेच स्त्रिया व मुलींच्या अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायदा, 1956 अंतर्गत विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुपा पोलीस करीत आहेत. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीष भोये, पोलीस अंमलदार अतुल लोटके, विष्णू भागवत, गणेश लोंढे, बिरप्पा करमल, बाळासाहेब नागरगोजे, प्रकाश मांडगे, महिला पोलीस अंमलदार चिमा काळे तसेच सुपा पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचार्‍यांनी संयुक्तरीत्या केली.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles