जमीन घोटाळा प्रकरणी पार्थ पवार निर्दोष… दोन वरिष्ठ अधिकारी मात्र अडचणीत

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांना पुण्यातील मुंढवा जमीन घोटाळाप्रकरणी चौकशी समितीकडून क्लीन चिट देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या प्रकरणात पार्थ पवार यांना मोठा दिलासा मिळाल्याचे मानले जात आहे. या जमीन व्यवहार प्रकरणात पार्थ पवार यांची स्वाक्षरी नसल्याने जमीन खरेदीशी त्यांचा थेट संबंध नाही, असा निष्कर्ष याप्रकरणाच्या चौकशीसाठी नेमण्यात आलेल्या विकास खरगे यांच्या समितीने काढला आहे.

जमीन घोटाळ्यातून क्लीन चिट मिळाल्यामुळे पार्थ पवार यांचा राज्यसभेवर जाण्याचा मार्ग मोकळा झाल्याचे सांगितले जाते. खासदार सुनेत्रा पवार यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त होणाऱ्या जागेवर पार्थ पवार यांना संधी मिळू शकते.

पुण्यातील सुमारे 1800 कोटी रुपये किंमतीची महार वतन जमीन 300 कोटी रुपयांना पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीने खरेदी केल्यावरुन प्रचंड वादंग निर्माण झाला होता. त्यामुळे या प्रकरणाच्या चौकशीसाठी महसूल सचिव विकास खारगे यांची समिती नेमण्यात आली होती. या समितीने महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे सोमवारी या चौकशीचा अहवाल सादर केला. यामध्ये पार्थ पवार यांचा मुंढवा जमीन व्यवहाराशी संबंध नसल्याचा निष्कर्ष नोंदवण्यात आला आहे. त्याचवेळी दोन सरकार अधिकाऱ्यांच्या विरोधात कारवाईची शिफारस करण्यात आली आहे

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles