राम मंदिर ट्रस्टच्या CEO मुलाखतीत उमेदवारांना कोणते प्रश्न विचारण्यात आले?तुम्ही कट्टर हिंदू आहात का, शेंडी ठेवता, जानवे घालता का?

‘श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट’च्या पूर्णवेळ मुख्य कार्यकारी अधिकारी पदासाठी नुकत्याच मुलाखती पार पडल्या. या मुलाखतींमध्ये उमेदवारांना विविध प्रकारचे प्रश्न विचारण्यात आले. यामध्ये उमेदवारांच्या धार्मिक पद्धती, खाण्यापिण्याच्या सवयींपासून ते राम मंदिरासंदर्भातील त्यांच्या दृष्टिकोनापर्यंत विविध प्रश्नांचा समावेश होता. सीईओ पदासाठी सुमारे ५,२०० अर्ज प्राप्त झाले होते, त्यापैकी शॉर्टलिस्ट केलेल्या १८ अंतिम उमेदवारांना अयोध्येत मुलाखतीसाठी बोलविण्यात आले होते. देणग्यांमध्ये अपहार झाल्याचे आरोप समोर आल्यानंतर पूर्णवेळ सीईओ नियुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
शॉर्टलिस्ट केलेल्या १८ अंतिम उमेदवारांना अयोध्येत झालेल्या मुलाखतीपूर्वी ३४ मुद्द्यांचा एक गुगल फॉर्म भरण्यास सांगण्यात आले होते. यामध्ये त्यांच्या कामाचा अनुभव, कुटुंब आणि हिंदू धर्मातील धार्मिक आचरण याविषयी प्रश्न विचारण्यात आले होते. तसेच, नेतृत्व कौशल्य आणि धार्मिक-सामाजिक उपक्रमांमधील सहभागाबाबतही माहिती विचारण्यात आली होती, असे वृत्त हिंदुस्तान टाईम्सने सूत्रांच्या हवाल्याने दिले आहे. यापूर्वी सर्व १८ उमेदवारांची ऑनलाईन मुलाखत झाली. मंगळवारी झालेल्या प्रत्यक्ष मुलाखतीसाठी केवळ आठ उमेदवारांना बोलावण्यात आले होते, यात चार माजी आयएएस अधिकाऱ्यांचा समावेश होता.“गुगल फॉर्ममध्ये ‘तुम्ही शेंडी ठेवता का?’, ‘तुम्ही जानवे घालता का?’, ‘तुम्ही पूर्ण शाकाहारी आहात की मांसाहार करता?’, ‘तुम्ही मद्यपान करता का?’, ‘तुम्ही कट्टर हिंदू आहात का?’, आणि ‘तुम्ही हिंदू धर्मानुसार पोषाख घालण्यास सोयीस्कर आहात का?’ यासारखे प्रश्न विचारण्यात आले होते.” तसेच ‘तुम्ही कुठे काम केले आहे?’, ‘तुम्ही यापूर्वी किती मोठ्या गर्दीचे व्यवस्थापन केले आहे?’ आणि ‘भगवान श्रीरामांवर तुमची किती श्रद्धा आहे?’ असेही प्रश्न विचारण्यात आले. उमेदवारांना त्यांच्या कुटुंबाविषयीही विचारणा करण्यात आली,” असे हिंदुस्तान टाईम्सच्या वृत्तात म्हटले आहे.

निवड समितीत सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती प्रमोद कोहली, निवृत्त लेफ्टनंट जनरल विष्णुकांत चतुर्वेदी आणि सुरेश हावरे यांचा समावेश आहे.या समितीवर तीन नावांची अंतिम निवड करून ती २ सप्टेंबरपूर्वी ट्रस्टकडे सुपूर्द करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्याच दिवशी ट्रस्टच्या कार्यकारी समितीची बैठक नियोजित आहे. त्यानंतर ट्रस्ट या अंतिम तीन उमेदवारांपैकी एकाची मुख्य कार्यकारी अधिकारीपदी निवड करण्यासाठी मुलाखत घेतली जाईल.न टाईम्सच्या वृत्तात म्हटले आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles