भीषण अपघातात वाडेगव्हाणचे सरपंच तथा उद्योजक किशोर यादव यांचा दुर्दैवी मृत्यू, एक दुचाकीस्वारही ठार

अहिल्यानगर – शिरुर बायपासवरील संग्राम हॉटेलसमोर मंगळवारी सायंकाळच्या सुमारास 5 वाजता झालेल्या भीषण अपघातात वाडेगव्हाण ता. पारनेर येथील उद्योजक तथा सरपंच किशोर यादव यांच्यासह मोटारसायकलस्वार प्रथमेश प्रकाश लाड रा. कुंडल ता. पलूस जि. सांगली यांचा मृत्यू झाला आहे. ही माहिती समजताच पारनेर तालुक्यात शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शिरुर बायपासवरील संग्राम हॉटेलसमोर किशोर यादव हे इंडेव्हर कारमधून प्रवास करीत होते. यावेळी एका कंटेनरने त्यांच्या कारला पाठीमागून जोरदार धडक दिली. त्यानंतर इंडेव्हर कारला समोरून येत असलेल्या शिवाई बसनेही धडक दिली. परंतू इंडेव्हर व बस यांच्यामध्ये एक मोटारसायकलस्वारही या अपघाताचा बळी ठरला आहे या भीषण अपघातात कारमधून प्रवास करणारे वाडेगव्हाणचे उद्योजक तथा सरपंच किशोर यादव यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तसेच समोरून जात असलेला मोटारसायकलस्वार प्रथमेश प्रकाश लाड यांचाही या अपघातात मृत्यू झाला आहे. लाड हे आयटी कर्मचारी असल्याचे सांगण्यात येत असून ते मुळचे सांगली येथील रहिवाशी असल्याचे सांगण्यात येत आहे.
अपघाताचे दृश्य अत्यंत विदारक होते. गाड्यांचा अक्षरशः चेंदामेंदा झाला होता आणि रस्त्यावर सर्वत्र काचा व वाहनांचे अवशेष विखुरलेले होते. घटनेचे गांभीर्य लक्षात येताच, अपघाताला कारणीभूत ठरलेला कंटेनर चालक स्वतःचा जीव वाचवण्यासाठी घटनास्थळावरून पसार झाला. त्याने आपले अवजड वाहन तिथेच सोडून पळ काढला. विशेष म्हणजे, हा सर्व थरार जवळच असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये स्पष्टपणे चित्रित झाला आहे. या चित्रिकरणामुळे घटनेची भीषणता किती मोठी होती, याचा अंदाज येतो. या पुराव्यामुळे तपासाला योग्य दिशा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

​घटनेची माहिती मिळताच शिरूर पोलीस तातडीने अपघातस्थळी पोहोचले. त्यांनी स्थानिक रहिवाशांच्या सहकार्याने अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे मदतकार्य वेगाने सुरू केले. महामार्गावर विस्कळीत झालेली वाहतूक पूर्ववत करण्यासाठी पोलिसांना मोठी कसरत करावी लागली. रस्त्यावरील गाड्या बाजूला करून मार्ग मोकळा करण्यात आला.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles