प्रेम प्रकरणात लग्न गाठ बांधताना घरच्यांंचा विरोध सहन करावा लागतो. तरीही काही जोडपी लग्न करतात आणि सुखाच संसार करतात राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनीही आपल्या लग्नाचा असाच किस्सा एका कार्यक्रमात सांगितला.
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुलगी पळून नेल्याचा खुमासदार किस्सा सांगितला. सांगलीच्या मिरजेमध्ये डिजिटल मीडियाच्या राज्य अधिवेशनात ते बोलत होते. यावेळी त्यांनी त्यांची प्रेमकथा समोर आणली. त्यांनी प्रेमासाठी वाट्टेल ते करण्याची तयारी दाखवली. घरच्यांचा विरोध असतानाही प्रेमासाठी खस्ता खाल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी त्या काळाला उजळला देत प्रेमासाठी तुरुंगवारी केल्याचेही सांगितले.
नागपूर येथे ‘कयामत से कयामत’ तक पिक्चर बघण्यासाठी होणार्या बायकोला घेऊन गेलो. त्यानंतर अल्पवयीन म्हणून पोलिसांनी पकडले. अल्पवयीन मुलगी पळवून नेल्याचा गुन्हा दाखल झाला. त्यामुळे 7 दिवस तुरूंगात राहावं लागलं असा किस्सा बावनकुळे यांनी सांगितला. पुढे जाऊन लग्न झालं, माझ्या मुलगी पळून नेल्याची टीका करणाऱ्या त्या इन्फ्ल्यूंसरला ती माझीच बायको होती,हे माहित नाही,अशी मिश्किल टिप्पणी केली, मंत्री बावनकुळे याची लव्हस्टोरी ऐकून सभागृहात एकच हशा पिकला.
घरच्यांना हे लग्न मान्य नव्हते. ते 10 बाय 10 च्या खोलीत राहिले. प्रसंगी त्यांनी दूध विकले. ऑटो चालवला. परिस्थितीच तशी होती की संसारसाठी ही कामं करावी लागली असे बावनकुळे यांनी सांगितले. तो काळ वाईट गेला. परिस्थितीनुसार काम करावे लागले. पण पुढे घरच्यांचा विरोध मावळला. त्यांनी दोघांनाही स्वीकारले. बावनकुळे यांनी त्यांची प्रेमकथा या कार्यक्रमात सांगितली.
ज्योती बावनकुळे आणि चंद्रशेखर बावनकुळे हे कयामत से कयामत तक सिनेमा पाहायला गेले. पण तिथे पोलिसांनी दोघांना पकडले. अल्पवयीन मुलीला पळवल्याप्रकरणी गुन्हा दाखल होऊन तुरुंगाची हवा खावी लागली. दोघांच्याही घरचे नाराज होते. बावनकुळेंच्या घराच्यांनी त्यांना थेट बाहेरचा रस्ता दाखवला. तेव्हा प्रेमासाठी आणि कुटुंबासाठी पडेल ते काम केल्याची आठवण बावनकुळे यांनी जागवली.


