भोंदूगिरी करून महिलांचं लैंगिक शोषण करणाऱ्या अशोक खरात या स्वयंघोषित बाबाला पोलिसांनी अटक केली असून त्याला २४ दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान, या प्रकरणामुळे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर अडचणीत आलेल्या असताना दुसरीकडे अजित पवार विमान अपघात प्रकरणीही या भोंदूबाबाचं नाव आता जोडलं जात आहे. आमदार रोहित पवार यांनीही याबाबत एक्स पोस्ट केली आहे.
“पुरोगामी विचारांच्या महाराष्ट्रात भोंदुगिरीला स्थानही नाही आणि त्यावर कोणाचा विश्वासही नाही, परंतु आमदार अमोल मिटकरी म्हणत असल्याप्रमाणे अजितदादांच्या सहयोग सोसायटी येथील निवासस्थानाच्या बाहेर केलेला जादूटोणा तसेच देवगिरी बंगल्याबाहेर नाशिकच्या भोंदूबाबाबाच्या माध्यमातून जादूटोणा झाल्याची समोर येत असलेली माहिती बघता हे प्रकरण खूपच भयंकर दिसते पुढे म्हणाले,
“नाशिकच्या भोंदूबाबाने हा जादूटोणा केला तर मग या भोंदुबाबाबाला भोंदुगिरीची सुपारी देणारे राजकीय राक्षस कोण? त्यांचा या राक्षसी महत्त्वाकांक्षेचा राजकीय हेतू काय होता? या काळात अजितदादांच्या बंगल्यावर भोंदू खरात याच्याशी जवळीक असणारे कोण कोण आले? २७ जानेवारी रोजी संबंधित लोक देवगिरिवर आले होते का? याचा तपास होणे गरजेचे आहे. सुनेत्राकाकी, पार्थ आणि जय यांनी काळजी घ्यावी, कारण आजचं बेभरवशी राजकारण चांगलं राहिलेलं नाही”, असंही रोहित पवार म्हणाले.ते”, असं रोहित पवार म्हणाले.


