सासू- सुनेचं नातं म्हटलं की सर्वांना आठवतं ते म्हणजे कडाक्याच भांडण.अनेकदा या नात्यात खटके उडतात तर अनेकदा जोरदार भांडणही होतात.सोशल मीडियावर बऱ्याच या नात्याबद्दले अनेक गमतीदार किस्से दाखवणारे व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत. मात्र सध्या व्हायरल होत असलेला व्हिडिओ काहीसा अनोखा आहे,ज्यात चक्क सासू-सुनेचा तुम्हाला धम्माकेदार डान्स पाहण्यासाठी मिळत आहे. कधी घराबाहेर कचाकच भांडणाना सासू-सूनेचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत तर अनेक कार्यक्रमांमध्ये एकमेंकीसोबत ताल लावून डान्स करतानाचे व्हिडिओ व्हायरल होत असतात,सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल ज्यात सासू-सूनेचा जबरदस्त डान्स पाहायला मिळत आहेत.
लग्नापुर्वी अन् लग्नातही नवरीला सर्वात जास्त कोणाची भीती वाटत असेल तर ती म्हणजे सासू. आपली सासू कशी असेल याची धाकधुक प्रत्येक नवरीला असते. पण समजा हीच सासू ढाँसू निघाली तर…सध्या एका सासूचा व्हिडिओ सोशल मिडियावर धमाल उडवतोय.सासू-सूनेच्या नात्याबद्दल आपण आजवर अनेक किस्से ऐकले आहेत. कधी छोट्या-छोट्या गोष्टींवरुन भाडंण तर कधी मायेचा ओलावा देणारे सासू-.सूनेचे हे नाते. सोशल मीडियावर आजवर अनेक व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत,त्यामध्ये या नात्याबद्दलचे अनेक व्हिडिओ आपण पाहिले आहेत. यात सासूने सुनेच्या समोरच असा काही धमाकेदार डान्स केला की सून आ वासून बघतच राहिली…
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत सासू-सुनेची जोडी दिसत आहे. गाणं सुरु होताच दोघीही डान्स करण्यास सुरूवात करतात. नाचू किती नाचू किती कंबर लचकली या गाण्यावर सासू-सुनेनं हा सुंदर डान्स केला आहे. व्हिडिओमधल्या सासूबाईंच्या डान्स स्टेप्स आणि एक्स्प्रेशन्स पाहिल्यानंतर ते अनेकांना पसंत पडत आहे. सासूबाईंच्या चेहऱ्यावरचे भाव तुम्हालाही खूप आवडतील. दोघीही इतक्या सुंदर नाचतायत, की त्यावरून तुमची नजर हटणार नाही. हा डान्स नेटकऱ्यांनाही खूप आवडलाय.
सोशल मीडियावर हा व्हिडीओ aish_ambre नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे.


