आधी अमित शाहांचा राजीनामा घ्या! भाजपच्या चार वरिष्ठ मंत्र्यांचे बंड खासदारांच्या दाव्याने खळबळ

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्ली दौऱ्यांवरून आणि केंद्रातील संभाव्य फेरबदलांवरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा जोरदार हल्लाबोल केला आहे. महाराष्ट्राचा एक मराठी माणूस देशाचा उपपंतप्रधान होणार असेल, तर आम्हाला नक्कीच आनंद होईल, असे विधान संजय राऊत यांनी केला आहे. राऊत यांच्या या दाव्याने केंद्रात आणि RSS मध्ये मोठ्या राजकीय घ

संजय राऊत यांनी कोल्हापूरमध्ये आज पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांची केंद्रीय राजकारणात एन्ट्री आणि दिल्लीत मोठी राजकीय उलथापालथ होणार असल्याचा दावा केला. संजय राऊत म्हणाले की, राष्ट्रीय राजकारणात लवकरच खूप मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केंद्रीय मंत्रिमंडळात मोठा फेरबदल करायचा आहे. मात्र पक्ष आणि सरकारमधील अंतर्गत मतभेदांमुळे हा निर्णय अद्याप रखडला आहे.डामोडी सुरू असल्याचा दावा केला आहे.

केंद्रातील परिस्थितीवर भाष्य करताना राऊत यांनी दावा केला की, “मूळ भाजपचे चार महत्त्वाचे आणि वरिष्ठ मंत्री राजीनामा देण्यास तयार नाहीत. पंतप्रधान मोदींच्या आवाहनाला या मंत्र्यांनी प्रतिसाद दिलेला नाही. ‘आधी अमित शाह यांचा राजीनामा घ्या, मगच आम्ही राजीनामा देऊ’ अशी भूमिका या मंत्र्यांनी घेतली आहे. त्यामुळेच मंत्रिमंडळाचा फेरबदल रेंगाळला आहे.”राऊत यांच्या मते, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची या फेरबदलात एक विशेष भूमिका आहे. संघाने केंद्रीय मंत्रिमंडळात ‘उपपंतप्रधान’ हे पद निर्माण करण्याची शिफारस केली आहे. पंतप्रधान मोदींनंतरचा पुढील वारसदार म्हणून अमित शाह यांच्याऐवजी संघाची निष्ठा असलेल्या एका नेत्याला या पदावर बसवण्याची योजना आहे, असा दावा त्यांनी केला. “अमित शाह यांचा राजकीय खेळ आता संपलेला आहे,” अशी टोलेबाजीही त्यांनी केली.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles