राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाचा मुद्दा संपला ;शरद पवार आणि अजित पवार गट स्वतंत्र मार्गावर.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येणार त्यांचे विलीनीकरण होणार अशा चर्चांचा वणवा गेल्या काही दिवसापूर्वी पेटला होता. परंतु आता दोन्ही राष्ट्रवादी म्हणजेच शरद पवार गट आणि अजित पवार गटाने वेगवेगळा मार्ग पकडला आहे. परंतु दोन्ही दिवगंत नेते अजित पवार आणि शरद पवार अनेक कार्यक्रमांमध्ये एकत्र दिसले होते. त्यामुळे राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याची सुरू झाली होती. परंतु अजित पवारांच्या निधनानंतर चर्चा रखडली. ही चर्चा कोणत्या कारणामुळे रखडली त्याचे कारण आता समोर आले आहे. शरद पवार गट राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी आतली गोष्ट बाहेर आणली आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना शशिकांत शिंदे यांनी राष्ट्रवादीचे विलीनीकरण होणार का नाही, यावर पुरुच्चार करत, हा विषय आमच्यासाठी संपल्याचं म्हटलंय.शशिकांत शिंदे कोल्हापुरात पत्रकारांशी बोलत होते, पक्षाच्या बांधणी करण्यासाठी कोल्हापूरमध्ये सुरवात करतोय. येत्या दीड महिन्यात राज्यात सर्व जिल्ह्यात पक्ष बांधणीचे कामं करणार आहे. पक्ष विलिनिकारण हा मुद्दा आमच्यासाठी संपला आहे. पवार साहेबांचा चेहराच पक्षासाठी महत्वाचा आहे. अजित दादा गेल्यानंतर विलीनीकरणबाबत बातम्या पसरवण्यात आल्या. तो आरोप आमच्यावर झाले. पण आता बोललो तर यावर तोंड उघडले तर गोष्ट कुठच्या कुठे जाईल, असं म्हणत शशिकांत शिंदे यांनी आपल्या विरोधकांना इशारा दिला.

दादा विलीनीकरणाची चर्चा करत होते. विलीनीकरण करण्याची त्यांची इच्छा होती.पण अजितदादा गेल्यानंतर आम्हाला गरज आहे असे दाखवण्यात आले. या सर्वामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम आहे, पण आज स्पष्ट मत आहे जे दाखवले जातंय ते स्पष्ट व्हावे म्हणून आम्ही निर्णय घेतला. भाजप ज्या पद्धतीने मित्र पक्षाची कोंडी करत आहेत, त्याला सावध होत अजितदादांनी विलीनीकरणाचा निर्णय घेतला असावा. पण आता विलीनीकरणाचा मुद्दा आमच्यासाठी संपला आहे. दरम्यान शशिकांत शिंदे यांनी आधीही विलीनीकरणाबाबत भाष्य केलं होतं. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यानंतर पुन्हा विलीनीकरणाची चर्चा सुरू झाली होती. त्यावर बोलतान शिंदे म्हणाले की, विलीनीकरणाचा विषय संपलेला आहे. त्यावर यापुढे कोणतीही चर्चा होणार नाही. आम्ही सक्षमपणे स्वतंत्र पक्ष म्हणून शरदचंद्र पवार यांच्या नेतृत्वाखाली आम्ही वाटचाल करणार आहोत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles