शिवसेनेच्या उपनेत्या शुभांगी पाटील यांचा शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश, पक्षप्रवेशानंतर शुभांगी पाटील म्हणाल्या

धुळ्यातील ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या शुभांगी पाटील यांचा शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. शुभांगी पाटील यांना पक्षप्रवेश काल दुपारी चार वाजता नियोजित होता. मात्र, एकनाथ शिंदे यांची प्रकृती बिघडल्यामुळे हा पक्षप्रवेशाचा सोहळा पुढे ढकलण्यात आला. अखेर शुक्रवारी रात्री 2 वाजता खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत शुभांगी पाटील यांचा ठाण्यात पक्षप्रवेश झाला . शुभांगी पाटील यांनी महाविकास आघाडीच्या तिकिटावर नाशिक पदवीधर मतदारसंघाची निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत शुभांगी पाटील यांनी 50 हजारांच्या जवळपास मतं घेतली होती.

मध्यरात्री झालेल्या पक्षप्रवेशानंतर शुभांगी पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. मी १५ वर्ष, १०० ते १५० आंदोलन केले, ३५ हजार शिक्षक घेऊन अपक्ष लढले. उद्धव साहेबांना बोलले होते, मला शिक्षक पदवीधर म्हणून उमेदवारी मिळावी पण वेगळंच घडलं. मी सामान्य कार्यकर्ता आहे म्हणून मला उमेदवारी दिली नाही, असा आरोप शुभांगी पाटील यांनी यावेळी केला.

एकदा आम्हाला तुमची वेळ द्या, २० हजारचा मागच्या वेळी मेळावा घेतला होता . २० ते ३० हजार शिक्षक दिसतील तुम्हाला, तुम्ही व्यवस्था केली त्याबद्दल आभार , अधिकमास गेला पण तो आज आहे असे मला जाणवलं असं पाटील म्हणाल्या. सर्व निवडणूक जिंकून येऊ हा शब्द देते, सर्वांच्या वतीने लाडक्या भावाला एकनाथ शिंदे याना उदंड आयुष लाभो , जी संधी तुम्ही द्याल ती आम्ही प्रामाणिक पणे पार पडू , काही चुकले असेल तर दिलगिरी व्यक्त करत असंही त्यांनी नमूद केलं.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles