भोंदू बाबा गणेश शिंदेला 2 मेपर्यंत पोलीस कोठडी ; श्रीरामपूरच्या बाबाच्या संपर्कातील अनेकजण नॉट रिचेबल

श्रीरामपूर-गेल्या 3 वर्षांपासून सतत अत्याचार केल्याच्या आणि तंत्र-मंत्र करून आजार बरे करण्याच्या नावाखाली 20 लाख रुपये घेतल्याच्या गुन्ह्याखाली बेलापूर येथील गणेश शिंदे या बाबाला अटक करण्यात आली आहे. त्याला न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने 2 मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी श्री. जाधव यांच्या न्यायालयासमोर गणेश शिंदे या बाबाला उभे केले होते. सदर बाब संवेदनशील असून, यामध्ये गुंगीच्या औषधांचा वापर केला असल्याने या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी बाबाला पोलीस कोठडी देण्यात यावी, अशी मागणी सरकारी पक्षातर्फे करण्यात आली.

सरकारी पक्षाचे म्हणणे ऐकल्यानंतर न्यायालयाने गणेश शिंदे या बाबास 2 मेपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. सरकार पक्षातर्फे सरकारी वकील एस. आर. माडेकर यांनी, तर बाबाच्या वतीने अ‍ॅड. जावेद शेख आणि अ‍ॅड. आरिफ शेख यांनी बाजू मांडली. बेलापूर येथे गणेश शिंदे या बाबाने दावल मलिक न्यासाची स्थापना करून आपल्याला दावल मलिक बाबा प्रसन्न झाले आहेत, असे सांगून भाविकांना लुबाडण्याचा गोरखधंदा सुरू केला होता. हे करत असताना त्याने हाताखाली काही दलाल नेमले होते. ते दलाल बाबाचा लई गुण येतो, बाबांच्या अंगात दैवी शक्ती आहे, असा प्रचार करायचे. बाबांचा दर गुरुवारी दरबार भरायचा. त्या दरबारात अनेक राजकीय, अराजकीय, नोकरदार आणि सामाजिक कार्यकर्ते यांचा भरणा असायचा.

बाबाच्या संपर्कातील अनेकजण नॉट रिचेबल
गणेश शिंदे या बाबावर गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याच्या संपर्कात असणारे सर्वजण काल नॉट रिचेबल होते. या बाबाच्या संपर्कात असणारे अनेकजण पोलीस चौकशीत समोर येणार असून, श्रीरामपूरसह परिसरातील अनेकांचे धाबे दणाणले आहेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles