प्रसिद्ध गायक शस्त्रक्रियेदरम्यान गाणे गाताना दिसला; व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल

जगप्रसिद्ध अभिनेता सोनू निगमने आजवर आपल्या सुरेल आवाजाने प्रेक्षकांना वेड लावले आहे. त्यांच्या लाइव्ह कॉन्सर्टला चाहत्यांची तुफान गर्दी पाहायला मिळते. सोनू निगमचे गाण्याप्रतीचे प्रेम आपण कायम पाहत आलो आहे. त्याने एक नुकताच व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात शस्त्रक्रिया सुरू असतानाही त्याने संगीताचा आनंद घेण्याचा क्षण साधला. शस्त्रक्रियेदरम्यान तो गाण गाताना दिसला. व्हिडीओत सोनू निगमच्या स्त्रक्रिया होताना दिसत आहे. तेव्हा त्याने डॉक्टर आणि संपूर्ण टीमसमोर मोहम्मद रफी यांचे एक अजरामर गाणे गायले. हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन टेबलवर झोपला असताना सोनू निगम गाणे गाताना दिसला. कठीण परिस्थितीचा आपल्या मनस्थितीवर परिणाम होऊ न देता, त्याने संगीताचा आनंद घेतला आहे. सोनू निगमने शेअर केलेल्या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, “माझ्या शस्त्रक्रियेदरम्यान प्रिय डॉ. निलेश सातभाई आणि त्यांच्या प्रेमळ टीमसाठी उत्स्फूर्त कामगिरी. वेदनेत गाणे.. संगीताचा आनंद!”


व्हिडीओत सोनू निगम १९४९ मधील ‘दुलारी’ चित्रपटातील मोहम्मद रफी यांचे प्रसिद्ध गाणे ‘सुहानी रात ढल चुकी’ गाताना दिसत आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर चाहते आणि कलाकारमंडळी कमेंट्स, लाइक्स आणि कौतुकाचा वर्षाव करत आहेत.

एका युजरने लिहिले की, “सोनू सर, लवकर बरे व्हा,” तर युजरने कमेंट केली, “तुमचा आवाज खूप कमाल आहे, तुमचे करावे तेवढे कौतुक कमी…” चाहत्यांनी निगमच्या सकारात्मक दृष्टिकोनाचेही कौतुक केले. सोनू निगमची ‘अभी मुझ में कहीं’, ‘कल हो ना हो’, ‘सूरज हुआ मद्धम’, ‘मैं अगर कहूँ’ आणि ‘साथिया’ ही गाणी प्रचंड गाजली.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles