राजकारणात गेल्या काही काळापासून मोठ्या घडामोडी घडताना पहायला मिळत आहेत. यातील सर्वात मोठी हालचाली राष्ट्रवादी पक्षात घडताना दिसत आहेत. अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षतील वाद चव्हाट्यावर येऊ लागले आहेत. पक्ष अध्यक्ष निवडीपासून ते पक्षातील कार्यकारणीपर्यंत सर्वकाही आलबेल नसल्याचे अनेकदा समोर आले आहे. आता सुनील तटकरेंच्या प्रदेशाध्यक्ष पदाला पक्षातूनच विरोध होतोय. सुनील तटकरे यांचे पद घटनाबाह्य अशी तक्रार थेट निवडणूक आयोगाकडे करण्यात आली आहे. अजित पवार पक्षातील काही नेते प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांच्यावर नाराज असल्याची चर्चा आहे. अशातच सुनील तटकरेंच्या प्रदेशाध्यक्ष पदाला पक्षातूनच विरोध होतोय. तटकरे यांचे पद घटनाबाह्य अशी तक्रार थेट निवडणूक आयोगाकडे करण्यात आलीय.
जालना जिल्ह्यातील मंठा-परतूर विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष भाऊसाहेब गोरे यांनी ही तक्रार केलीय. पक्षाच्या संविधानाला डावलून, अंतर्गत लोकशाहीचे नियम धाब्यावर बसवून तटकरेंची नियुक्ती करण्यात आलीय. सुनील तटकरेंचा कार्यकाळ घटनाबाह्य असल्याचा आक्षेप घेत भाऊसाहेब गोरे यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केलीय.
गोरे यांनी आपल्या तक्रारीत तटकरेंच्या कार्यकाळावरून सवाल केलाय. सुनील तटकरेंच्या नियुक्तीचा 3 वर्षांचा सामान्य कार्यकाळ जुलै 2026 मध्येच संपुष्टात आला आहे. कोणतीही संघटनात्मक निवडणूक न घेता तटकरे अद्याप पदावर कसे कार्यरत आहेत? असा सवाल त्यांनी केलाय. तटकरेंच्या जालना दौऱ्यात अजित पवारांच्या नावाच्या घोषणा दिल्याने तटकरेंनी जिल्ह्यातील अनेक पदाधिकार्यांना पदावरून हटवल्याचाही आरोपही भाऊसाहेब गोरे यांनी केलाय. राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनीही तटकरेंनी प्रदेशाध्यक्ष पद सोडावे अशी मागणी केलीय. अजित पवार सुद्धा प्रदेश अध्यक्ष बदलणार होते, असा दावाही रुपाली ठोंबरे यांनी केलाय.


