ठाकरेंच्या सेनेचे ६ खासदार शिंदेंच्या गळाला ? चंद्रशेखर बावनकुळेंची मोठी प्रतिक्रिया , म्हणाले

राज्याच्या राजकारणात ‘ऑपरेशन टायगर’वरून मोठ्या घडामोडी सुरू आहेत. उद्धव ठाकरे यांची शिवसेना पुन्हा एकदा फुटीच्या उंबरठ्यावर आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून ‘ऑपरेशन टायगर’ राबवण्यात येत असून ठाकरेंच्या शिवसेनेचे ६ खासदार फुटल्याची चर्चा आहे. याबाबत दिल्लीत राजकीय हालचाली सुरू आहेत.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘ऑपरेशन टायगर’वरून आता राजकीय वर्तुळातून अनेक नेत्यांच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. ऑपरेशन टायगरबाबत भारतीय जनता पक्षाकडून पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. भाजपाचे नेते तथा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यमांशी संवाद साधत ‘ऑपरेशन टायगर’वरील चर्चांबाबत प्रतिक्रिया देत महत्वाचा खुलासा केला आहे. ‘ऑपरेशन टायगरशी भाजपाचा काहीही संबंध नाही’, असं स्पष्टीकरण चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलं आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून ‘ऑपरेशन टायगर’अंतर्गत ठाकरेंच्या शिवसेनेचे ६ खासदार फोडण्याचे प्रयत्न सुरू असल्याच्या चर्चा आहेत. या चर्चांवर बोलताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं की, “एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचा निर्णय एकनाथ शिंदे घेतील आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचा निर्णय उद्धव ठाकरे घेतील. मात्र, भारतीय जनता पक्षाचा या ‘ऑपरेशन टायगर’शी काहीही संबंध नाही. त्यामुळे या ‘ऑपरेशन टायगर’शी आमच्या नेत्यांना काही बोलणं योग्य नाही. ज्या विषयाशी संबंधित आम्हाला काहीही माहिती नाही, त्यामुळे त्याबाबत आम्हाला काही बोलणं योग्य नाही”, असं स्पष्टीकरण चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलं आहे.
“उद्धव ठाकरे यांनी आपला पक्ष सांभाळावा, एकनाथ शिंदे यांनी त्यांचा पक्ष वाढवावा, याबाबत कोणाचीही ना नाही. ज्यांनी-त्यांनी आप-आपल्या पक्षाचा निर्णय घ्यायचे असतात. आता उद्धव ठाकरे यांना त्यांच्या पक्षाचे लोक का सोडून चालले? याचं आत्मचिंतन त्यांनी करावं. मात्र, या विषयाशी तथा ऑपरेशन टायगरशी भारतीय जनता पक्षाचा काहीही संबंध नाही”, असंही चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles