जंतर-मंतरवर गोंधळ; सोनम वांगचुक यांना रुग्णालयात नेलं तर अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात

नवी दिल्लीतील जंतरमंतर येथे गेल्या २१ दिवसांपासून बेमुदत उपोषणाला बसलेले सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक यांना शनिवारी सकाळी कडेकोट पोलीस बंदोबस्तात राम मनोहर लोहिया रुग्णालयात नेण्यात आले. दरम्यान, जंतर मंतर येथे गोंधळ झाला असून आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज झाल्याचं अभिजीत दिपके यांनी सोशल मीडियावर सांगितलं. तसंच, पोलिसांनी अभिजीत दिपके यांनाही ताब्यात घेतलं आहे.

वांगचूक आणि त्यांचे समर्थक आंदोलन करत असलेल्या जंतरमंतर मैदानाभोवती मोठ्या संख्येने पोलीस बंदोबस्त तैनात केल्यामुळे प्रचंड गोंधळ उडाला. सोशल मीडियावर समोर आलेल्या व्हिडिओंमध्ये, पोलीस अधिकारी वांगचूक यांना रुग्णालयात नेत असताना पोलीस आणि आंदोलकांमध्ये तीव्र वाद आणि शाब्दिक चकमक झाल्याचं दिसून आलं.“५९ वर्षीय सोनम वांगचूक यांची ढासळती प्रकृती लक्षात घेऊन दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आणि तज्ज्ञ वैद्यकीय सल्ल्यानुसार ही कारवाई करण्यात आली आहे”, असं दिल्ली पलिसांनी एक्सपोस्ट मध्ये म्हटलं आहे.

वांगचूक यांना नेमक्या कोणत्या कारणासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. त्यांच्या या बेमुदत उपोषणाचा आज २१ वा दिवस असून, विविध सामाजिक संघटना आणि कार्यकर्त्यांकडून त्यांच्या या आंदोलनाला मोठा पाठिंबा मिळत आहे.
https://x.com/ANI/status/2078298512673149308?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E2078298512673149308%7Ctwgr%5E0642ff466e5612da6e1973326601e0797c88b8e9%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.loksatta.com%2Fdesh-videsh%2Fsonam-wangchuk-hunger-strike-delhi-police-hospitalized-jantar-mantar-abhijeet-dipke-detained-sgk-96-6026247%2F

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles