सनसनाटी… राष्ट्रवादीत उभी फुट, 22 आमदारांसह पटेल-तटकरे ‘कमळ’ हाती घेणार..

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अंतर्गत लाथाळ्या थांबण्याची चिन्हे नाहीत. प्रफुल्ल पटेल यांना पदच्युत केल्याचे सोमवारी सायंकाळी उघड झाल्याने एकच खळबळ उडाली होती. त्यातच मध्यरात्री पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवार यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाला पाठवलेल्या पत्रात कारकुनी चूक झाल्याचे स्पष्ट केले. परंतु राष्ट्रीय कार्यरकारिणीत पटेल यांना कायम ठेवले असले, तरी त्यांना पद न देणे; तसेच सुनील तटकरे यांच्याही नावासमोर राष्ट्रीय सरचिटणीस किंवा प्रदेशाध्यक्ष असे न लिहिल्याने कमालीचा गोंधळ निर्माण झाला आहे.

२२ आमदार घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दिग्गज नेते सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल हे भारतीय जनता पक्षातून लढणार, असा सनसनाटी दावा राष्ट्रवादी काँग्रेस : शरदचंद्र पवार पक्षाचे नेते रोहित पवार यांनी केला आहे. भाजपप्रवेश कधी करायचा, हे ठरणं बाकी असल्याचं रोहित पवार म्हणाले. ते पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते.

“त्यांचं ठरलेलं आहे ऑलरेडी. २२ आमदारांचं ठरलं आहे. एकनाथ शिंदे यांच्याही काही आमदारांचं ठरलं आहे. ज्या गोष्टी ठरल्या आहेत, त्याबद्दल मोघम बोलून चालत नाही. जे आहे ते आहे. भाजपमधून ते लढणार आहेत. फक्त प्रक्रिया फास्ट झाली. २०२९ च्या निवडणुकांपूर्वी होणं अपेक्षित होतं. कारण आताच प्रवेश झाला, तर पुन्हा निवडणूक लागेल.” असं रोहित पवार म्हणाले. भाजपसोबत जे आहेत, त्यांच्याबरोबर आम्ही जाणार नाही, पण भाजपची साथ सोडून कोणी आमच्याकडे आलं, तर त्यांना स्वीकारु, असंही रोहित पवार म्हणाले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles